Afghanistan : विमानाच्या पंखाला लटकलेल्या अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा खाली पडून मृत्यू
काबुलहून अमेरिकेला जाणाऱ्या एका विमानाला लटकलेल्या दोघांचा हजारो फूट खाली पडून मृत्यू झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये Zaki Anwari या युवा फुटबॉलपटूचा समावेश आहे.

काबुल : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मिळेल त्या मार्गाने काही नागरिकांनी देश सोडून जायचा प्रयत्न सुरु केला. या संबंधी अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशाच एका विमानाला लटकलेल्या दोघांचा हजारो फूट खाली पडून मृत्यू झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये एकजण हा अफगाणिस्तानचा युवा फुटबॉलपटू होता. झाकी अन्वरी (वय 19) असं त्याचं नाव असून अफगाणिस्तानच्या फुटबॉल संघाने एक चांगला खेळाडू गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अफगाणच्या इतर नागरिकांप्रमाणे झाकी अन्वर काबुलहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानाच्या विंगेला कवटाळून बसला. ज्या पंखांच्या आधारे अन्वरने देश सोडण्याचे स्वप्न पाहिलं त्याच पंखांमुळे त्याच्या आयुष्याचे पंख तुटले आहेत. देशासाठी फुटबॉल खेळण्याचं स्वप्न अन्वरने पाहिलं होतं, तोच देश सोडण्यासाठी अन्वरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अफगाण राष्ट्रीय फुटबॉल टीमच्या फेसबुक पोस्टवर याबाबत माहिती देण्यात आली.
अमेरिकेने प्रशिक्षित केलेल्या अफगाणिस्तानच्या तीन लाख सैन्यांनी केवळ 60 ते 80 हजारांच्या तालिबान्यांसमोर गुडघे टेकलं असून त्यामुळे देशात अनागोंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती काही भयावह बनत आहे, हे दाखवणारे आता अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. नागरिक देश सोडून जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे. विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांना गर्दी केलीय.
काबुल विमानतळ एकमेव मार्ग आहे जिथून लोक देश सोडून बाहेर जाऊ शकतात. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक तिथे जमले आहेत. येथील भयावह स्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. विमानात जागा नाही म्हणून लोक रेल्वे, बसला जसं लटकावं तसं विमानाला लटकताना दिसत आहेत. काही लोकांनी विमान टेक ऑफ घ्यायच्या आधी विंगमध्ये बसून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. विमान ज्यावेळी हवेत होतं, त्यावेळी काही जणांना खाली पडून मृत्यू झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे.
पहा व्हिडीओ : Afghan Football player Death विमानावरून पडून मृत्यू झालेला झाकी अन्वर अफगाणचा राष्ट्रीय फुटबॉलपटू
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
