(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तालिबानने भारतासोबतचा व्यापार थांबवला, भारतात सुकामेवा महागण्याची शक्यता
भारतात अफगाणिस्तानातून वर्षांला 38 हजार 650 लाख डॉलरची उलाढाल सुक्या मेव्याची होत असते.
मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे साम्राज्य आल्याने याचा परिणाम सुक्या मेव्यावर होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात सुक्या मेव्याची आवक वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये होत असते. मात्र आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये घातलेल्या उन्मादामुळे सुक्या मेव्याची आवक मंदावणार असल्याने दरात वाढ होताना दिसत आहे.
भारतात अफगाणिस्तानातून वर्षांला 38 हजार 650 लाख डॉलरची उलाढाल सुक्या मेव्याची होत असते. सुक्यामेव्याचे बाजारभाव मार्केटमध्ये वाढले असून तालिबानच्या नावाखाली मुंबई एपीएमसी बाजारात सुकामेव्याचे बाजारभाव व्यापाऱ्यांनी वाढवले आहेत. अद्याप जुनाच सुकामेवा बाजारात असून नविन माल न आल्याने येणाऱ्या सणासुधीच्या काळात याची कमतरता भासणार आहे. गणपती, दसरा, दिवाळी सणाच्या दरम्यान अफगाणिस्तानमधील सुक्या मेव्याची आवक सुरळीत न राहिल्यास भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. बंद पडलेले अफगाणिस्तानातील बँकिंग क्षेत्र सुरू झाल्यास पुन्हा माल येण्यास सुरुवात होईल अशी आशा एपीएमसी मधील व्यापारी वर्गाला आहे. सध्या 10 ते 15 टक्यांची भाववाढ सुक्या मेव्या मध्ये झाली आहे.
मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात सुक्या मेव्या दर्जानुसार सध्याचे किलोचे दर
काळा मनुका | 220 - 550 रुपये |
अंजीर | 200 – 1400 रुपये |
जर्दाळू | 175 – 800 रुपये |
खजूर | 100 – 1000 रुपये |
शहाजिरा | 415 – 500 रुपये |
खरजीरा | 480 रुपये |
काळा किशमिश | 280 – 600 रुपये |
हिरवा किशमिश | 200 ते 800 रुपये |
चिलकुजा | 200 ते 4000 रुपये |
कच्चा हिंग | 2000 ते 5000 रुपये |
अक्रोड | 800 ते 1000 रुपये |
बदाम | 700 ते 1000 रुपये |
पिस्ता | 800 ते 1600 रुपये |
संबंधित बातम्या :