Pakistani Vlogger : पाकिस्तानी ट्रॅव्हल व्लॉगरचा भारतापर्यंत बाईकने प्रवास, भारतीयांच्या प्रेमाने अबरार हसन भारावला
Pakistani Vlogger In India: एका पाकिस्तानी ट्रॅव्हल व्लॉगरने नुकताच भारत दौरा पूर्ण केला. या भारत दौऱ्यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्लॉगरने आपल्या भारतीय दौऱ्याला 'फ्रेंडशिप टूर', असं नाव दिलं आहे.
Pakistani Travel Vlogger : एका पाकिस्तानी ट्रॅव्हल व्लॉगरने (Pakistani Travel Vlogger In India) नुकताच भारत दौरा पूर्ण केला. या भारत दौऱ्यामुळे तो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत आहे. या व्लॉगरने आपल्या भारतीय दौऱ्याला 'फ्रेंडशिप टूर', असं नाव दिलं आहे. या दरम्यान भारतीय लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे हा पाकिस्तानी ट्रॅव्हलर प्रचंड भारावला आहे. विशेष म्हणजे त्याने पाकिस्ताने ते भारत हा प्रवास चक्का बाईकवरुन (Bike) केला. अबरार हसन असं या ट्रॅव्हल व्लॉगरचं नाव आहे.
या पाकिस्तानी ट्रॅव्हल व्लॉगरने आपल्या फ्रेंडशिप टूर दरम्यान 30 दिवसांत 7,000 हजार किलोमीटपेक्षा जास्त प्रवास केला. यादरम्यान हसनने बाईकवरुन दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मुंबई, केरळ आणि इतर शहारांत प्रवास केला. यादरम्यान हसनला वेगवेगळे अनुभव आले. हे अनुभव त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केले आहेत. त्याच्या युट्यूब चॅनेलचं नाव 'वाईल्डलेन्स बाय अबरार' (WildLens by Abrar) असं आहे. या पाकिस्तानी ट्रॅव्हलरने त्याच्या इन्स्टाग्रामवर भारत भेटीचे अनेक संस्मरणीय आठवणींचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो प्रचंड आनंदी असल्याचं दिसून येत आहे.
अनेक वर्षांपासून भारतात येण्याचा प्रयत्न
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हसनने लिहिले की, गेल्या अनेक वर्षापासून व्हिसा मिळवण्याठी प्रयत्न केल्यानंतर यावेळी शेवटी मी यशस्वी झालो." या प्रवासादरम्यान हसनला भारतीयांकडून प्रचंड प्रेम आणि आपुलकी मिळाली. याविषयी त्याने आपल्या सोशल मीडिया हँडल आणि चॅनलवर माहिती शेअर केली आहे. ट्रॅव्हलर हसनने आपल्या भारत दौऱ्याचा एक व्हिडीओही इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये तो मुंबईतील गर्दीच्या मध्यभागी उभा असल्याचं दिसतं. हसनभोवती जमलेल्या गर्दीतील लोक त्याच्याकडून ऑटोग्राफ घेताना दिसत आहेत. यासोबत ही जमलेली गर्दी त्याला खूप प्रोत्साहन देताना दिसते.
प्रत्यक्ष भारत पाहून हसन झाला भावूक
पाकिस्तानी ट्रॅव्हलर हसनेने मुंबईत मिळालेल्या प्रेमानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, "ये है मुंबई". यासोबत त्याने केरळविषयी म्हटलंय की, "केरळला उगाचच देवभूमी म्हणत नाही.' त्याने पुढे लिहिले की, कदाचित केरळचे बॅकवॉटर हे केरळमधील अनेक अद्भुत ठिकाणांपैकी एक आहे. ज्याला प्रत्येकांनी पाहायला हवं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :