Viral Video: बंगळुरुच्या चोर बाजारात परदेशी व्लॉगरसोबत गैरवर्तन; हात पकडून केली अरेरावी, आरोपीला अटक
विदेशी व्लॉगरच्या व्हिडीओमध्ये ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी बंगळूरु स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Dutch YouTuber Attacked: नेदरलँडच्या एका युट्यूब व्लॉगरशी झालेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे .बंगळूरच्या एका गजबजलेल्या मार्केटमध्ये ही घटना घडली आहे या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विदेशी व्लॉगरच्या व्हिडीओमध्ये ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी बंगळूरु स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. हल्ला करण्यात आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती बंगळूरु वेस्ट डिव्हिजनचे डीसीपी लक्ष्मण बी निमबारगी यांनी दिली आहे.
नेदरलँड येथील व्लॉगर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर पेड्रो माता सध्या भारतात आला आहे. भारतात तो बंगळुरूमध्ये चोरबाजारामध्ये फिरत असताना स्थानिक दुकानदारने त्याच्याशी गैरवर्तन केले. गैरवर्तन करणारा व्यक्ती चोर बाजारामधील दुकानदार आहे. पेड्रोने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दुकानदाराला धारेवर धरले आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट, लवकरात लवकर दुकानदारावर कारवाई करा, देशात आलेल्या पाहुण्यांचा अपमान आहे, अशा प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडीओमध्ये पेड्रोने घडलेल्या प्रसंग सांगितला आहे.
Karnataka | A Dutch vlogger Pedro Mota was manhandled on a busy road in the Chickpet area of Bengaluru while the YouTuber was recording a vlog on the streets
— ANI (@ANI) June 12, 2023
Regarding a complaint about misbehaving with foreigner Pedro Mota, a case has been registered against the person Navab… pic.twitter.com/P72rOzH2x8
बंगळूरुच्या चोरबाजारात शूट करत असताना दुकानदाराने यूट्यूबरचा पेड्रोचा हात पकडला. काय चालू आहे? असं म्हणत या दुकानदारानं हात पकडला. यूट्यूबरनं आपला हात सोडण्याची विनंती केल्यानंतरही या दुकानदारानं हात न सोडता अरेरावी सुरूच ठेवली. अखेर पेट्रोने तिथून काढता पाय घेतला आणि बाहेरची वाट धरली.
दुकानदाराविरोधात तक्रार दाखल
पोलिसांनी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून दुकानदाराला अटक देखील केली आहे. हयात शरीफ असे गैरवर्तन करणाऱ्या दुकानदाराचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी दुकानदाराच्या विरोधात कर्नाटक पोलिस अॅक्टच्या कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळूरू सिटी पोलिसांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. पोलिसांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देशात येणाऱ्या परदेशी पाहुण्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
हे ही वाचा :