Landslide Afghan province of Nuristan : अफगाणिस्तानच्या नूरिस्तानमध्ये भीषण भूस्खलनात 25 ठार, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले
नूरिस्तान प्रांतात भूस्खलनामुळे सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. नूरगाराम जिल्ह्यात भूस्खलनामुळे सुमारे 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुमारे 15 ते 20 घरांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.
500 कर्मचारी बेपत्ता असल्याची भीती
नुकत्याच झालेल्या पावसामुळे नूरिस्तान, कुनार आणि पंजशीर प्रांतातील रस्ते बंद झाले आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुखांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खामा प्रेसने पंजशीर प्रांतात हिमस्खलन झाल्याचे वृत्त दिले आहे. त्याचा फटका बसल्याने सुमारे 500 कर्मचारी बेपत्ता झाले आहेत.
A landslide has occurred in the northeastern Nuristan Province of Afghanistan, specifically in the Tetin valley of the Nurgram district. The death of 25 people has been confirmed so far, and there may be more casualties. The region is currently experiencing a harsh winter. (1) pic.twitter.com/XPZV71tkPv
— Zakeria Shnizai (@shnizaii) February 19, 2024
अफगाणिस्तानला अनेकदा भूस्खलन आणि हिमस्खलन
मात्र, पंजशीरच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता कर्मचाऱ्यांपैकी 2 आधीच मरण पावले आहेत. अलीकडच्या काळात अफगाणिस्तानला अनेकदा भूस्खलन आणि हिमस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त इथली ढासळणारी अर्थव्यवस्था ही देखील संकटाची बाब आहे. परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. आधीच गरिबीने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानलाही आंतरराष्ट्रीय एकाकीपणाला सामोरे जावे लागले आहे. 2021 मध्ये तालिबानच्या आगमनानंतर आणखी आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामुळेच अफगाणिस्तान दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत बुडत चालला आहे.
Atleast 30 people have lost their lives and dozens injured in a landslide in Nurgram district of Nuristan province. Efforts underway by IEA forces, rescue teams & locals to evacuate injured & retrieve bodies under snow. pic.twitter.com/s7bwVXxBs5
— Ibn Sufyan (@IbnSufyan313) February 19, 2024
इतर महत्वाच्या बातम्या