Death Penalty Indian Navy Personnel in Qatar : कतारमधील न्यायालयाची भारतीय नौदलाच्या 8 माजी जवानांना फाशीची शिक्षा, निर्णय धक्कादायक असल्याची भारताची प्रतिक्रिया
Death Penalty Indian Navy Personnel in Qatar : कतारमधील न्यायालयाने एका वर्षाहून अधिक काळ देशात नजरकैदेत असलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
![Death Penalty Indian Navy Personnel in Qatar : कतारमधील न्यायालयाची भारतीय नौदलाच्या 8 माजी जवानांना फाशीची शिक्षा, निर्णय धक्कादायक असल्याची भारताची प्रतिक्रिया A court in Qatar has handed down the death penalty to eight former Indian Navy personnel Death Penalty Indian Navy Personnel in Qatar : कतारमधील न्यायालयाची भारतीय नौदलाच्या 8 माजी जवानांना फाशीची शिक्षा, निर्णय धक्कादायक असल्याची भारताची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/26/54b54ac847023bedb2548a8b33d47d761698320260383736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
दोहा (कतार) : कतारमधील न्यायालयाने एका वर्षाहून अधिक काळ देशात नजरकैदेत असलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयानंतर भारतात खळबळ उडाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व कायदेशीर पर्याय शोधत असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सांगितले की, हे आठ जण कतारस्थित अल दाहरा कंपनीत काम करतात. हे आठ जवान भारतीय गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 पासून कतारमध्ये तुरुंगात आहेत.
सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे सुरू ठेवेल
कतारमधील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो असून आम्ही सविस्तर निर्णयाच्या प्रतीची वाट पाहत आहोत. मंत्रालयाने सांगितले की, आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत. आम्ही ही बाब अत्यंत महत्त्वाची मानतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. सर्व कॉन्सुलरआणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे सुरू ठेवेल. कतारी अधिकार्यांकडेही हा निर्णय मांडणार आहे.
जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला
प्रमुख भारतीय युद्धनौकांचे नेतृत्व करणार्या अधिकार्यांसह हे माजी आठ जवान दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीसाठी काम करत होते जे कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि संबंधित सेवा पुरवत होते. त्यांचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला आणि कतारी अधिकाऱ्यांनी त्यांची नजरकैदेत वाढ केली होती. आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे की कतारच्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने आज अल दाहरा कंपनीच्या 8 भारतीय कर्मचार्यांचा समावेश असलेल्या खटल्यात निकाल दिला आहे. आम्हाला फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे खूप धक्का बसला आहे आणि आम्ही तपशीलवार निकालाची वाट पाहत आहोत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)