एक्स्प्लोर

फोनवर हिंदी बोलणं महाग पडलं, इंजिनिअरला नोकरी गमवावी लागली

Speaking in Hindi: फोनवर हिंदीत किंवा इतर कोणत्याही भाषेत बोलल्याने नोकरी जाऊ शकते, याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का? मात्र, असे घडलं आहे.

Fired for speaking Hindi:  नोकर कपात (Job Cut) अथवा शिस्तभंगाच्या कारणाने नोकरी जाणे ही नेहमीची बाब आहे. अशा घटना सतत घडत असतात. गेल्या दीड वर्षापासून जगभरात नोकर कपात सुरू आहे. पण नोकरीवरून काढल्याचं हे प्रकरण मात्र धक्कादायक आहे. फोनवर हिंदीत (Hindi) किंवा इतर कोणत्याही भाषेत बोलल्याने नोकरी जाऊ शकते, याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का? मात्र, असे घडलं आहे.

कंपनीविरुद्ध खटला दाखल केला

नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. फोनवर हिंदीत बोलल्यामुळे एका इंजिनिअरला आपली नोकरी गमवावी लागली आहे. हे प्रकरण अमेरिकेतील असून भारतीय वंशाच्या अभियंत्याशी संबंधित आहे. भारतीय वंशाचे अभियंता अनिल वार्ष्णेय यांनी त्यांच्या तत्कालीन कंपनीविरुद्ध याबाबत खटला दाखल केला आहे. अनिल वार्ष्णेय हे 78 वर्षांचे आहेत. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गमावली नोकरी

वार्ष्णेय यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ते आपल्या कुटुंबातील एका आजारी सदस्याशी फोनवर बोलत होते. त्यांचे संभाषण हिंदीत होत होते आणि याच कारणावरून ते काम करत असलेले  पार्सन्स कॉर्पोरेशनने त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोकरीवरून काढून टाकले. या कारणाने आता  अनिल यांनी जून महिन्यात अलाबामा प्रांतातील न्यायालयात खटला दाखल केला आहे.

अनेक दशके अमेरिकेत वास्तव्य

वार्ष्णेय यांच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर त्यांनी  अमेरिका गाठली. वार्ष्णेय हे अनेक दशकांपासून अमेरिकेत आहेत आणि आता त्यांचे वय 78 वर्ष आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत तो हंट्सविले क्षेपणास्त्र संरक्षण कंत्राटदार कंपनी पार्सन्स कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ यंत्रणा अभियंता म्हणून काम करत होते. 

वर्णद्वेषाचा आरोप

वार्ष्णेय हे 1968 पासून अमेरिकेत आहेत. त्यांनी ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमधून इंडस्ट्रियल अॅण्ड सिस्टम्स इंजिनियरिंग मध्ये  पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांची पत्नी शशी यांनी नासामध्ये काम केले आहे. वार्ष्णेय यांनी या खटल्यात सांगितले की, ते सर्वोत्कृष्ट संरक्षण अभियंत्यांपैकी एक आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्टर ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला आहे. वार्ष्णेय यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांवरही वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. वर्णद्वेषातून आपली तक्रार करण्यात आली आणि नोकरी गमवावी लागली असल्याचे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Embed widget