एक्स्प्लोर
एकाच रुग्णालयातल्या आयसीयूतील 16 नर्स एकाच वेळी गर्भवती
अमेरिकेतील अॅरिझोनात असलेल्या मेडिकल सेंटरच्या आयसीयूमध्ये कार्यरत 16 नर्स प्रेग्नंट आहेत

न्यूयॉर्क : एकाच हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 16 नर्स एकाच वेळी गर्भवती असल्याची इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेतील अॅरिझोना हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. सर्व नर्सनी एकत्र फोटोशूट करत आपला आनंद व्यक्त केला.
अॅरिझोनाच्या मेसामधील बॅनर डेझर्ट मेडिकल सेंटरच्या आयसीयूमध्ये या 16 नर्स काम करतात. त्यापैकी बहुतांश जणींची डिलीव्हरी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
'प्रेग्नंट असलेल्या नर्सचा एक फेसबुक ग्रुप आम्ही तयार केला. त्यानंतर एकामागून एक जण अॅड होत गेली आणि आपण 16 जणी एकाच वेळी गर्भवती असल्याचं आमच्या लक्षात आलं' असं आठ महिन्यांची गरोदर असलेली नर्स रोशेल सांगते.
एकाच वेळी 16 प्रेग्नंट नर्स पाहून हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही आश्चर्यचकित होतात. सर्व जणी मॅटर्निटी लीव्हवर गेल्यानंतर बदली नर्सची भरती करणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























