एक वर्षाचा चिमुकला महिन्याला कमावतोय 75 हजार रुपये
Travel Influencer : एक वर्षाचा मुलगा महिन्याला ७५ हजार रुपयांची कमाई करतो... आश्चर्यचकित झालात ना?
एक वर्षाच्या चिमुकल्याकडून काय आपेक्षा केली जाते? तो नोकरी करु शकतो का? पैसे कमवू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरे नाही अशीच असतील. पण अमेरिकेतील एक वर्षाचा मुलगा महिन्याला ७५ हजार रुपयांची कमाई करतो... आश्चर्यचकित झालात ना? पण खरं आहे... अमेरिकेतील बेबी ब्रिग्स या चिमुकल्याचा पराक्रम सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. नेटकरी बेबी ब्रिग्सचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. इतक्या लहान वयात 75 हजार रुपयांची कमाई कसं करत असले? असा प्रश्न तुम्हालीही नक्कीच पडला असेल. पाहूयात... बेबी ब्रिग्स महिन्याला 75हजार रुपयांची कमाई कशी करतो....
बेबी ब्रिग्स आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा प्रवास करणारा आहे. तो अमेरिका खंडात प्रवास करुन महिन्याला 1000 अमेरिकन डॉलरची ( 75 हजार रुपये) कमाई करतो. बेबी ब्रिग्सची स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्याचे फोटोही क्यूट आहेत. नेटकरी फोटोवरही फिदा झाले आहेत.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बेबी ब्रिग्सने आतापर्यंत 45 वेळा विमानप्रवास केला आहे. त्याने अमेरिकेतील एक दोन नव्हे तब्बल 16 राज्यात प्रवास केलाय. यामध्ये अलास्का, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, यूटा आणि इडाहो या शहरांचा समावेश आहे. बेबी ब्रिग्सची आई जेस हिने सांगितलं की, 14 ऑक्टोबर 2020 मध्ये बेबी ब्रिग्सचा जन्म झाला होता. तो अवघ्या तीन आठवड्याचा असताना पहिला विमानप्रवास केला. बेबी ब्रिग्सनं अलास्कामध्ये अस्वल, येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये लांडगे आणि कॅलिफोर्नियामधील समुद्र किनारे पाहिलेत.
View this post on Instagram
ब्रिग्सचे इन्स्टाग्रामवर 30000 पेक्षा आधिक फॉलोअर्स आहेत. ब्रिग्सची आई जेस पार्ट टाइन टुरिस्ट्स नावाचा ब्लॉग लिहित होती. ज्यासाठी तिला जगभरात फिरण्यासाठी पैसे दिले जात होते. गर्भवती झाल्यानंतर जेसला करिअर संपल्याची भिती वाटली होती. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत जेस म्हणाली की, मला आणि माझ्या पतीला आणखी काम करायचं होतं. त्यासाठी मी अशा सोशल मीडिया खात्याचा शोध घेतला जो बेबी ट्रॅव्हलबाबात सांगेल. पण मला असं सोशल मीडिया खातं मिळालं नाही. त्यानंतर मी स्वत:च सोशल मीडियावर खातं उघडलं. बेबी ब्रिग्सला स्पॉन्सरही मिळाला. तो स्पॉन्सर ब्रिग्सला मोफत डायपरसह इतर गोष्टी देतो.
View this post on Instagram