भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?
भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार स्थापन करता आलेलं नसल्यामुळे आता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते असा संघर्ष सुरू झाला असल्याची कुजबुज पक्षात सुरू आहे आणि या नाराजांचं नेतृत्व पंकजा मुंडे आणि आता एकनाथ खडसे करत आहेत का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
![भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या? why Bjp leader unhappy eknath khadse vinod tawade pankaja munde भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/02195429/WEB-eknath-khadse-vinod-tawde-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
दुसरीकडे, विधानसभा निवडणूक आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपचे नेते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान काल पकंजा मुंडे यांच्या भेटीनंतर विनोद तावडे यांनी आज एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मात्र पक्षात कुठलाही वेगळा मतप्रवाह नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.
आज, बंडखोरांचं भाजपसमोर कोणतंही आव्हान नाही. भाजप मजबूत पक्ष असून आम्ही सर्व एकत्र आहोत. योग्य वेळी आम्ही एकजूट असल्याचं तुम्हाला दिसून येईल. निवडणुका येतील तेव्हा आमची एकी सर्वांना दिसेल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे..
पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांवरही एकनाथ खडसेंनी वक्तव्य केलं. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोपीनाथ गडावर जाणार आहे. त्यावेळी पंकजा मुंडेंना भेटून चर्चा करणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं. पक्षात सध्या कोणतेही वेगळे मतप्रवाह नाहीत. पक्षात वेगळे मतप्रवाह असल्याच्या बातम्या आम्हाला बाहेरुन कळतात, ज्या आम्हालाच माहित नसतात, असं खडसेंनी म्हटलं. भाजपच्याच लोकांमुळे अनेक भाजपच्या उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं, या प्रश्नावर बोलणं मात्र एकनाथ खडसेंनी टाळलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)