एक्स्प्लोर
कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?
शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधे मागे कीटकनाशक फवारतानाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे यावर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे.

प्रातिनिधिक फोटो
यवतमाळ : शेतकऱ्यांना झालेल्या विषबाधे मागे कीटकनाशक फवारतानाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे यावर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे. कीटकनाशकांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?
- कीटकनाशक फवारताना सगळ्यात आधी त्यावर लिहीलेल्या गुणधर्मांची माहिती घेणं गरजेचं आहे.
- तसेच, त्यावर काही चिन्हं दिलेली असतात, ज्यावरुन त्याच्या जहालपणाचं प्रमाण मिळतं. यामध्ये हिरवा रंग कमी विषारी, निळा मध्यम विषारी, पिवळा तीव्र विषारी आणि लाल अति विषारीसाठी वापरला जातो.
- सोबतच त्या कीटकनाशकाचा उत्पादन दिनांक आणि वापरण्याचा कालावधी पाहून घ्यावा. कालावधी संपलेले कीटकनाशक वापरु नये.
- कृषी विभागानं शिफारस केलेल्या प्रमाणातच रसायनं घ्यावी.
- रसायनांच्या भुकटीला सुरुवातीला थोड्या पाण्यात मिसळावं.
- त्यानंतर गरजेनुसार त्यात पाणी टाकावं.
- मिश्रण तयार करताना हातमोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.
- सोबतच फवारणी करतांना अंग झाकलेलं असणं गरजेचं असतं. यामध्ये हात आणि पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड आणि अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे.
- फवारणी करताना पंपाचे नोझल शरिरापासून दूर धरावे. जेणेकरुन कीटकनाशक अंगावर पडणार नाही. कारण, विषबाधा झालेल्या बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये हिच तक्रार दिसून आली आहे.
- तसेच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये.
- पाऊस येण्याआधी किंवा पाऊस झाल्यानंतर फवारणी करु नये.
- फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावं.
- फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरु नये. विषबाधेचे लक्षणं दिसून आल्यास त्वरीत काही प्राथमिक उपाय करावे.
- कीटकनाशक फवारतांना योग्य नोझलची निवड करणंही गरजेचं असतं.
- बुरशीनाशकाची फवारणी केलेल्या नोझलचा किटकनाशकासाठी वापर करु नये.
- नोझल गळका असल्यास त्याचा वापर टाळावा.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























