एक्स्प्लोर

Washim News : आमदार पुत्राची माणुसकी! वडिलांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सोडून थेट गाठले नुकसाग्रस्त शेतकऱ्यांचे शेत

Washim News: आमदार पुत्राने वडिलांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रमापेक्षा नुकसाग्रस्त शेतकाऱ्यांच्या दु:खात त्यांना साथ देणे आपले कर्तव्य समजल्याने त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.  

Washim News वाशिमअवकाळी पाऊस  (Unseasonal Rain) आणि गरपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांना बसला असून त्यात वाशिम जिल्ह्याच्या देखील समावेश आहे. अशातच शेतकाऱ्यांशी कळवळा असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या दु:खात त्यांना धीर देणे हे आपले कर्तव्य समजणाऱ्या एका आमदार पुत्राच्या माणुसकीचे दर्शन सध्या जिल्ह्याला झाले आहे. या आमदार पुत्राने वडिलांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रमापेक्षा नुकसाग्रस्त शेतकऱ्यांच्या दु:खात त्यांना साथ देणे आपले कर्तव्य समजल्याने त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.  

अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सोडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर  

वाशिमच्या कारंजा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी याचं 23 फेब्रुवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झालं. विद्यमान असलेले आमदार पाटणी यांनी मतदारसंघात जिल्ह्यातील विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, त्यांना झालेल्या किडनी आणि कॅन्सरच्या विकारामुळे त्यांना मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र 23 तारखेला आमदार पाटणी यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आणि  24 तारखेला  पाटणी यांच्यावर वाशिम च्या मोक्षधाम स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेला तीन दिवस होत नाही, तर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या अवकाळीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले. जिल्ह्यातील मंगरूळपीर कारंजा मतदारसंघाला या अवकाळी नुकसानीच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागल्या. 

मात्र, मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मृत्यू झाल्यामुळे नेमका शेतकऱ्यांना प्रश्न पडला की, आपल्या व्यथा कुणापुढे मांडायची आणि न्याय कोणाला मागायचा. अशा संकटाच्या वेळेस आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र गयांक पाटणी यांनी क्षणाचाही विचार न करता आपलं दुःख बाजूला करत शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. हरभरा, गहू,  कांदा पीक यासह फळबागांचे झालेल्या नुकसानाची त्यांनी पाहणी केली आणि  मतदारसंघातील शेवती, धामणी, या गावात झालेल्या घरांची नुकसान पाहणी करून गयांक पाटणी यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. सोबतच या संकटकाळात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे करून मदतीसाठी चर्चाही केली. 

शेतकऱ्याचं मोठं नुकसान

त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांना काही अंशी धीर तर मिळालाच, शिवाय मदतीचे आश्वासन मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत. याविषयी भाष्य करतांना गयांक पाटणी यांनी सांगितलं की,  माझ्या वडिलांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना मला मतदारसंघात गारपिटीने झालेल्या नुकसानीबद्दल माहिती मिळाली. ज्या मतदारसंघात एक वेळ नाही तर तीन वेळा भरघोस मतांनी ज्या मतदार संघातील लोकांनी निवडून दिले, त्या लोकांसाठी आपण काही तरी सामाजिक देणे लागतो. या हेतूने मी स्वतः काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी आणि एकंदरीत परिस्थिती बघण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. शेतकऱ्याचं झालेलं मोठं नुकसान, घराची झाली पडझड, प्राणी-पक्ष्यांची झालेली जीवितहानी बघता याबद्दल वाशिम जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना फोन करून या संदर्भात मी माहिती दिली.

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या

झालेले नुकसान संदर्भात सर्वे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, असं त्यांना मी सांगितलं. सोबतच मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनाही या परिस्थिती संदर्भात कळवलं आणि पत्रव्यवहार केला तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हा विषय कळवला असल्याचे गयांक पाटणी म्हणाले. यानंतर दोन्ही मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात आदेश दिले असून शेतकऱ्यांनाही मदतीसाठी आश्वस्त करण्यात आल्याचे देखील पाटणी म्हणाले. एकूणच घरचा कोणी करता पुरुष किंवा मोठा माणूस गेला की त्यांच्या जाण्याच दुःख बाळगून अनेक दिवस, अनेक महिने लोक त्या दुःखातून सावरत नाही. मात्र इतक्या तरुण वयात वडिलांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आमदार पुत्रांनी केलेले काम हे सध्या जिल्ह्यावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहाAditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेलAjit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget