Washim News :समृद्धी महामार्गावर डिझेल चोरणारी टोळी सक्रिय, पोलिसांच्या कारवाईत दोघे गजाआड
Washim News : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरणाऱ्या टोळीतील दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Washim News : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) उभ्या वाहनातून डिझेल चोरी होण्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गावर कारंजा जवळ पुन्हा डिझेल चोरणाऱ्या दोन आरोपींना गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रक आणि कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टँकमधून पाईप आणि मोटरच्या सहाय्याने डिझेल चोरीचा प्रकार घडल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री (28 जुलै) रोजी सकाळी वाशिमच्या (Washim) वनोजा जवळ पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना एका गाडीतून डिझेल चोरीला जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी या चोरांचा पाठलाग सुरु केला. या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच वाशिमध्ये पुन्हा एकदा ही घटना घडली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्ग हा निर्मिती पासूनच तर काम पूर्ण होईपर्यंत नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता. यामध्ये अपघात, जमिनी खरेदी अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. त्यातच सरकारकडून हा मार्ग समृद्धीचा कसा आहे तसेच यामुळे शेतकऱ्यांची समृद्धी कशी होणार हे लोकांना पटवून देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हटलं जात होतं. नागपूर ते मुंबई असे 710 किलोमीटरचे अतंर अवघ्या काही तासांमध्ये या समृद्धी महामार्गावरुन पूर्ण करता येते. पण यावर होणारे अपघात देखील चर्चेचा विषय ठरले होते.
अनेकदा या महामर्गावर चोरीच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यातच आता डिझेल चोरीच्या घटनांनी नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झाले असल्याचं म्हटलं जात आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. अनेकदा या महामर्गावर चोरीच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यातच आता डिझेल चोरीच्या घटनांनी नागरिक पुन्हा एकदा त्रस्त झाले असल्याचं म्हटलं जात आहे. रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत.
दरम्यान या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. पण त्यातील इतर आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहे. अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी ह्या तीन आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहे. सध्या इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
