एक्स्प्लोर

Agriculture News : हरभरा पिकावर घाटे अळीचे आक्रमण, वाशिम जिल्ह्यात रब्बी पीक धोक्यात; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Agriculture News : वाशिम (Washim) जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळं आणि गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या धुक्यामुळं हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Agriculture News : वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या वातावरणातील बदलाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे थंडी आणि तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळं पिकांवर रोगराई पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळं आणि गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या धुक्यामुळं हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 

फवारणीसाठी औषधांचा मोठा खर्च 

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण बदलत्या हवामानाचा त्यांच्या पिकांवर परिणाम होत आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळं हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळं  आधीच हरभरा पिकावर मर रोगाची लागण झाली होती. कसेबसे पिक जगवण्याची धडपड सुरु असताना आता घाटे आळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च करावा लागणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातही कापूस आणि हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव

आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad)काही भागात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.  तर कापसावर (Cotton) देखील लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बदलत्या वातावरणामुळं औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, वेरूळ, पळसवाडी, कसाबखेडा, चिंचोली, पिंपरी, आखतवाड़ा परिसरात हरभऱ्यावर मर, तर कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तळकोकणातील सुपारी उत्पादक शेतकरी चिंतेत

तळकोकणातील सुपारी उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणाचा सुपारी पिकावर परिणाम होत आहे. सुपारीला गळ लागली आहे. गळ लागलेल्या सुपारीला योग्य दर नाही, त्यामुळं सुपारी फेकून देण्याची वेळ आली आहे. तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News: औरंगाबादच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली! हरभऱ्यावर मर रोगाचा तर कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Bank Holiday: बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?
बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी? 
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Bank Holiday: बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?
बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी? 
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
XI Jinping: ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Embed widget