एक्स्प्लोर

Wardha : दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 

Wardha Liquor Ban : वर्ध्यात दारूबंदी असताना चोरून दारू विक्री करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दारू विक्रीसाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात असल्याचं दिसून आलं.

वर्धा : दारूबंदी जिल्हा अशी वर्ध्याची ओळख असली तरी दारू विक्रीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात असते. कधी देवघराच्या ड्रॉवरमध्ये दारू लपवली जाते तर कधी जॅकेटमधून ती लपवून विकली जाते. अशा अनेक घटना या पूर्वी पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. पण आता चक्क दुचाकीवर दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांची तस्करीची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दुचाकीवरून येणारा दूध विक्रेता की दारू विक्रेता असा सवाल उपस्थित झाला आहे.

वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची देवळी परिसरात अवैध धंदे बंद करण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होती. तेव्हा मिळालेल्या माहितीवरून वर्धा ते कळंब मार्गावर सापळा रचला गेला. नजर ठेवून असताना पोलिसाना दुचाकी गाडीवर प्रशांत कोंबे हा व्यक्ती दुधाचे कॅन घेऊन दिसला. दुचाकीवरून दोन्ही बाजूला दूध संकलन करण्यास उपयोगात येणारे कॅन अटकवून तो चालल्याचे दिसून आले. 

पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास जे आलं ते चकीत करणारं होतं. कॅनमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. दारू तस्करी करणाऱ्या आरोपीसह बार मालकवरही गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त केला आहे. 

अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर

दारू विकण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत दारू विक्रेत्यांकडून वर्ध्यात दारू विकली जात असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, दारू विक्रेत्यांनी आता देवालाही सोडलं नसल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. दोन महिन्यांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली. वर्ध्याच्या गणेश नगर येथील एका दारू विक्रेत्याने चक्क देवघरातच दारूची साठवणूक करून तेथून दारू विक्री चालवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. 

या प्रकाराची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी अचानक धाड टाकत घराची झडती घेतली. सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पण ज्यावेळी घराच्या आत असलेल्या देवघरात पाहणी केली त्यावेळी देवघरात देवाच्या आसनाच्याखाली असलेल्या ड्रॉवरमध्ये दरूसाठा सापडला. याशिवाय काही बॉटल फ्रीजमध्ये देखील सापडल्या आहेत. पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला आणि दारू विक्रेत्याला बेड्या ठोकल्या.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर चक्क एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी, बदलापुरात थाटला कारखाना, पोलिसांना कुणकुण लागली अन्...
रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर चक्क एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी, बदलापुरात थाटला कारखाना, पोलिसांना कुणकुण लागली अन्...
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTejukaya Ganpati Shroff Building : तेजूकायाच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगसमोर पुष्पवृष्टीदुपारी 2 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2PM 17 September 2024Kolhapur Ambabai : कोल्हापूरात बाप्पाच्या मिरवणुकीत अंबाबाई अवतरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर चक्क एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी, बदलापुरात थाटला कारखाना, पोलिसांना कुणकुण लागली अन्...
रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणाचा वापर चक्क एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी, बदलापुरात थाटला कारखाना, पोलिसांना कुणकुण लागली अन्...
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Kadambari jethwani: जिच्यामुळे तीन IPS अधिकाऱ्यांचं निलंबन झालं, ती कादंबरी कोण?; मुंबईत कधी आली
जिच्यामुळे तीन IPS अधिकाऱ्यांचं निलंबन झालं, ती कादंबरी कोण?; मुंबईत कधी आली
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Embed widget