एक्स्प्लोर

अखेर मुन्नाचा जंगलात पुन्हा मुक्त संचार, टिपेश्वर अभयारण्यात आढळलेल्या जखमी अस्वलावर उपचार

Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याच्या वनपरिक्षेत्रात जखमी अवस्थेत आढळलेल्या अस्वलावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

वर्धा : टिपेश्वर अभयारण्याच्या वनपरिक्षेत्रात जखमी अवस्थेत आढळलेल्या अस्वलावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. करुणाश्रमातील कर्मचाऱ्यांनी लाडाने 'मुन्ना' असं त्याचं नाव ठेवलं. यवतमाळ जिल्ह्यातील पंढरकवड्यातील पारवा वनक्षेत्रात एक अस्वल जखमी असल्याचे दिसून आले. वर्ध्याच्या करुणाश्रमातील पीपल फॉर एनिमल्सच्या वन्यप्राणी बचाव पथकाला रात्री एक वाजता पाचारण करण्यात आले. 20 दिवसांच्या उपचारानंतर आणि जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर अस्वलाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. 

5 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पंढरकवड्यातील पारवा वनक्षेत्रात एक अस्वल जखमी असल्याचे दिसून आले. जखमी असलेल्या व वेदनेने विव्हळत असलेल्या अस्वलाला लवकरात लवकर बंदिस्त करणे आवश्यक होते. कारण जंगलालगतच्या गावकऱ्यांना यापासून धोका निर्माण झाला असता. गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते आणि मानव वन्यजीव संघर्षाने सुद्धा पेट घेतला असता. अशातच पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या नेतृत्वाखाली या अस्वलाला उपचारासाठी पिंजऱ्यात बंदीस्त करण्याची मोहीम सुरू झाली. 
 
यानंतर अस्वलाला योग्य पद्धतीने उपचार व बचाव मोहीम राबविण्यात यावीसाठी वर्धा करुणाश्रमातील पीपल फॉर एनिमल्स च्या वन्यप्राणी बचाव पथकाला रात्री एक वाजता पाचारण करण्यात आले. या अवाढव्य अस्वलाचा वावर नाल्याजवळ असल्याने वनविभागाने रात्री तिथेच पिंजरा लावला. पण रात्र असल्याने जंगलात जोखीम पत्करून  बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. वनविभाग व करुणाश्रमातील चमू मार्फत संयुक्त रित्या राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेला तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी अस्वलाला बंदीस्त करण्यात यश आले.

डोक्याला ठिक ठिकाणी जखमा झाल्या होत्या व जखम जुनी असल्याने त्यात जंतू देखील पडले होते. करुणाश्रमातील पथकाने त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार करून अस्वलाला पुढील उपचारासाठी करुणाश्रम पीपल फॉर एनिमल्स संचालित वन्यप्राणी बचाव केंद्रात हलविले. या अस्वलाचे वय अंदाजे 13 ते 14 वर्ष असल्याचे समजले व जखमांमध्ये जंतू पडल्यामुळे अस्वलाची वर्तवणूक आक्रमक होती. उपचरादारम्यान 3 ते 4 दिवस त्याने अन्न सुद्धा खाल्ले नाही. जखम भरत गेली तसे अस्वलाच्या वर्तनातही बदल होत गेला. 20 दिवसांच्या उपचारानंतर आणि जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर अस्वलाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

ही संपूर्ण मोहीम पांढरकवडा उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. दुमरे, रवींद्र कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे, मनीष पवार, मंगेश बाळापुरे तसेच करुणाश्रमातील चमू कौस्तुभ गावंडे, पीयूष धोबे, डॉ संदीप जोगे, सुमित जैन ऋषिकेश गोडसे यांनी राबवली.

महत्त्वाच्या बातम्या

'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Embed widget