एक्स्प्लोर

Vijaysinh Pandit: लक्ष्मण हाकेंना काहीजण चावी देतात, ते चार्जिंगवर चालणारे बाहुले; आमदार विजयसिंह पंडितांची बोचरी टीका

Vijaysinh Pandit : लक्ष्मण हाके यांना काहीजण चावी देतात आणि चार्जिंगवर चालणारे बाहुले आहेत, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर केली आहे.

Vijaysinh Pandit on Laxman Hake : लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना काहीजण चावी देतात आणि चार्जिंगवर चालणारे बाहुले आहेत, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांनी लक्ष्मण हाकेंवर केली आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा होता, त्याला मी पाठिंबा दिला. महायुती सरकारने कुणालाही अडचण होणार नाही याची काळजी घेतली, असेही आमदार विजयसिंह पंडित म्हणाले. आता राजकारण करण्याची वेळ नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक इथे राजकारण करत आहेत. पुन्हा तेच समाजात तेढ कसा निर्माण होईल. असा केविलवाणा प्रयत्न माझ्या भागात ते लोक करत आहेत. असं म्हणत त्यांनी नाव घेता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake) टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Vijaysinh Pandit on Laxman Hake : लक्ष्मण हाके चार्जिंगवर चालणारे बाहुले

माझ्या मतदार संघातील जनता सुज्ञ आहे. राज्य सरकार दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे लोक वारंवार येणार आहेत. लक्ष्मण हाके यांना काहीजण चावी देतात आणि ते चार्जिंगवर चालणारे बाहुले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे षडयंत्र आहे, त्यातून या गोष्टी केल्या जात आहेत. याला कोणीही थारा देणार नाही. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी आमची आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा होता, त्याला मी पाठिंबा दिला. मात्र महायुती सरकारने कुणालाही अडचण होणार नाही. याची काळजी घेतली. हैदराबाद गॅझेट लागू करून सरकारने मराठा समाजाला दिलासा दिला आणि तो लढा यशस्वी झाला. निवडणुकीसाठी मी हाके यांचे स्वागत करतो. पुढचे चार वर्ष त्यांनी टिकून रहाव. लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम आणि समाजात तेढ निर्माण करू नका. विकासाचे राजकारण करून टिकून रहा. असा सल्लाही आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांनी दिला आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) जीआरवरून (GR) भाजप (BJP) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'भारतीय जनता पार्टीने स्वतःला ओबीसींचा डीएनए म्हणून एका बाजूला सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं आरक्षण संपविणारा जीआर काढायचा?', असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला आहे. हैदराबाद गझेटियर जीआरच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षण संपवल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. जर ओबीसी समाज एकत्र आला नाही, तर पुढच्या पिढ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होईल, असा इशारा देतानाच, आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असा एल्गारही हाके यांनी केला. या सभेत प्रस्थापित मराठा नेत्यांवरही टीका करण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Shani Transit 2026: 6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget