Beed OBC Morcha: बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन; सभेपूर्वी मराठा-ओबीसी संघर्ष शिगेला; मराठा समन्वयकांना पोलिसांच्या नोटीस
Mahaelgar Morcha in Beed : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी आज (17ऑक्टॉबर) बीडमध्ये महाएल्गार सभेचे (OBC Mahaelgar Sabha) आयोजन करण्यात आले आहे.

Beed OBC Morcha : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी आज (17ऑक्टॉबर ) बीडमध्ये महाएल्गार सभेचे (OBC Mahaelgar Sabha) आयोजन करण्यात आले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थित शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सायंकाळी चार वाजता सभेला सुरुवात होणार आहे. या महाएल्गार सभेकडे (Beed OBC Morcha) साऱ्यांचे लक्ष लागले असताना या सभेपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण झालाय. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे (Gangadhar Kalkute) यांच्यासह इतर समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं, असा आक्रमक पवित्रा मराठा समाजाने घेतलाय. दरम्यान या सभेची तयारी पूर्ण झाली असून आजच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Gangadhar Kalkute on OBC Morcha: मराठा समन्वयकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे तणाव
बीडमध्ये आज होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सभेला पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांसारखे प्रमुख ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे तणाव निर्माण झाला आहे,
'मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊनच बीड मध्ये प्रवेश करावा अन्यथा त्यांना या ठिकाणी पाय ठेवून दिला जाणार नाही,' असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे (Gangadhar Kalkute) यांनी दिला आहे. जीआर (GR) लागू झाल्यानंतर छगन भुजबळ यांची ही पहिलीच मोठी सभा असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पावसामुळे ही सभा रद्द करण्यात आली होती. मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्षाला या सभेमुळे नवीन तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Chhagan Bhujbal : महाएल्गार सभेत भुजबळ मुंडे एकाच व्यासपीठावर
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ही सभा आयोजित करण्यात आली असून त्यांच्यासोबत ओबीसींच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे संबोधित करणार आहेत, त्यामुळे छगन भुजबळांच्या सोबत धनंजय मुंडे देखील या व्यासपीठावर दिसणार आहेत. सोबतच या महाएल्गार सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर , ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे देखील उपस्थित असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























