एक्स्प्लोर

Urban Naxalism: शहरी माओवादचं डोळ्यात अंजन घालणारं वस्तव! ज्या माओवाद्याला 2011 पासून ATS शोधत होतं, तो चक्क आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षक निघाला

Urban Maoism: "शहरी माओवाद" (Urban Naxalism) कशा छुप्या पद्धतीने तुमच्या आमच्या अवतीभवती कार्यरत असतो, याचं एक डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण महाराष्ट्रातून समोर आलं आहे.

Urban Maoism: "शहरी माओवाद" (Urban Naxalism) कशा छुप्या पद्धतीने तुमच्या आमच्या अवतीभवती कार्यरत असतो, याचं एक डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण महाराष्ट्रातून समोर आलं आहे. ज्या माओवाद्याला 2011 पासूनएका गंभीर गुन्ह्यात एटीएस शोधत होते, तो प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे पुणे आणि रायगड दरम्यान एका गावात आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षक म्हणून 2017 पासून 2025 पर्यंत उजळ माथ्याने फिरत होता. विशेष म्हणजे 2017 च्या पूर्वी तो 2011 ते 2017 दरम्यान गडचिरोलीतील घनदाट जंगलात माओवाद्यांच्या दलममध्ये कार्यरत होता. 2017 नंतर स्वतःला एटीएस आणि पोलिसांच्या नजरेतून लपवून ठेवण्यासाठी त्याने "सुनील जगताप" असे बनावट नाव धारण केले होते. 

सुनील जगताप या नावाने स्वतःचे सर्व बनावट डॉक्युमेंट्स

धक्कादायक बाब म्हणजे सुनील जगताप या नावाने त्याने स्वतःचे सर्व बनावट डॉक्युमेंट्स ही तयार करून घेतले होते. या नव्या खोट्या नावाने स्वतःला समाजात स्थापित करण्यासाठी, स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्याने 2018 मध्ये एका डॉक्युमेंटरीमध्ये काम करून त्या माध्यमातून तो कसा उत्कृष्ट शिक्षक आहे, त्याला आदिवासी विद्यार्थ्यांची किती काळजी आहे, हे सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.

शहरी माओवादचं डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण

दरम्यान, अजून एक धक्कादायक बाब म्हणजे 2011 पासून एटीएस ज्या माओवाद्याला शोधत होते त्याची 2018 मध्ये डॉक्युमेंटरी तयार झाल्यानंतर ही एटीएसला त्या संदर्भात काहीही माहिती मिळाली नव्हती. मे 2025 मध्ये प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळेला पुण्यात अटक झाल्यानंतर तपासात हे सर्व खुलासे झाले आहे. त्यामुळे शहरी माओवादी स्वतःची प्रतिमा उंचावणारे काम फक्त दाखवण्यासाठी करून कसे तुमच्या आमच्या अवतीभोवतीच कार्यरत राहतात, याचं हे धक्कादायक उदाहरण म्हणावा लागेल.

माओवाद्यांकडून 10 जूनला देशव्यापी बंदचे आवाहन

माओवाद्यांकडून (Naxalites) येत्या 10 जूनला देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हे बंदचे आवाहन माओवाद्यांकडून करण्यात आलंय. त्यासाठी देशभर 'स्मारक सभा' आयोजित करण्याचे ही माओवाद्यांचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच केंद्र सरकारने माओवाद्यांच्या शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत 21 मे रोजी 27 माओवाद्यांची हत्या केल्याचा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget