एक्स्प्लोर

उल्हासनगरच्या व्यापाऱ्याची भन्नाट आयडिया, एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लीटर पेट्रोल देणार फ्री!

उल्हासनगरच्या व्यापाऱ्यानं एक भन्नाट शक्कल लढवली आहे. आपल्या दुकानात एक हजार रुपयांची खेरदी केल्यास ग्राहकांना एक लीटर पेट्रोल फ्री देण्यात येत आहे. गेल्या 3 दिवसांत 28 ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे.

कल्याण : एकीकडे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच त्यात पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. उल्हासनगरच्या एका चादरी आणि पडदे विकणाऱ्या दुकानदाराने भन्नाट शक्कल लढवली आहे. एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लीटर पेट्रोल फ्री देण्याची ऑफर त्याने सुरु केली आहे. त्याच्या या ऑफरला ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

उल्हासनगरच्या शिरू चौकात असलेल्या शीतल हँडलूम या दुकानाच्या मालकानं ही नवी ऑफर सुरु केली आहे. या दुकानात चादरी आणि पडदे विकले जातात. दुकानाचे मालक ललित शिवकानी यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लीटर पेट्रोल फ्री ही आगळीवेगळी ऑफर सुरु केली आहे. यासाठी 17 सेक्शनच्या एचपी पेट्रोलपंपासोबत दुकानमालकाने टायअप केलं आहे. या दुकानातून एक हजार रुपयांच्या चादरी किंवा पडदे विकत घेतल्यास तर ग्राहकांना एक लीटर पेट्रोलचं एक कुपन दिलं जातं. हे कुपन पेट्रोलपंपावर दिल्यास एक लीटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. याबाबतचा फलक मालक ललित शिवकानी यांनी दुकानाच्या बाहेरसुद्धा लावला आहे. या ऑफरला ग्राहकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत 28 ग्राहकांनी 1 हजारांपेक्षा जास्त खरेदी करत हे कुपन मिळवलं आहे. त्यांच्या या ऑफरची सध्या उल्हासनगरमध्ये चर्चा रंगली आहे.

वर्धापनदिनानिमित्त मनसेकडूनही पेट्रोलवर सूट 

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंधरावा वर्धापन दिन आहे. मात्र, यावर्षी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोणताही मोठा कार्यक्रम मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजच्या वर्धापनदिनी वडाळ्यातील मनसे कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना एका वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करायचे ठरवले आहे. यासाठी मनसेने एक उपक्रम हाती घेतला यामध्ये दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असताना कुठलाही दिलासा सर्वसामान्य लोकांना ना राज्य सरकारकडून मिळतोय ना केंद्र सरकारकडून. काल राज्याच्या अर्थसंकल्पातही पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींवर राज्य सरकारकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. अशातच मनसेनं आजच्या वर्धापन दिनी वडाळ्यातील नऊ पेट्रोल पंपावर प्रति लिटर 15 रुपयांची सूट देत सर्वसामान्यांना एक प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीविरोधात सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

वर्धापनदिनी मनसेकडून पेट्रोल-डिझेलवर 15 रुपयांची सूट, मुंबईच्या वडाळ्यात मनसेचा अनोखा उपक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 01 March 2025Anjali Damania on Walmik Karad | आरोपींना फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा-दमानियाBeed Walmik Karad Case | 'खंडणीत आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषलाही धडा शिकवा', आरोपपत्रात नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 01 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
Santosh Deshmukh Murder Case : रात्री झोप येत नाही, आईकडे, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
रात्री झोप येत नाही, आई, लेकरांकडे बघू वाटत नाही; जे तळमळीनं सांगितलं, तेच चार्जशीटमध्ये समोर आलं; धनंजय देशमुख काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...
Embed widget