एक्स्प्लोर

कोरोनाची फ्लू बरोबर तुलना केल्याने ट्रम्प यांच्या ट्विटवर कारवाई

आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेले अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी नवीन ट्विट करून कोरोनाची तुलना फ्लूशी केली आहे. त्यांच्या या ट्विटला रेड फ्लॅग देवून ट्विटरने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी एक ट्विट करून कोरोनाची तुलना फ्लूशी केल्याने ट्विटरने त्यांचे ते ट्विट लाल शेरांकित केले आणि त्यांना चेतावणी देताना असे म्हंटले आहे की त्यांची ही माहिती दिशाभूल करणारी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ट्विट त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासातच केले. डोनाल्ड ट्रंम्प हे कोरोना पॉझिटिव्ह असुन नुकतेच ते मेरिलँड मधील वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमधून डिस्चार्ज घेवून व्हाईट हाऊसवर आले आहेत. ' फ्लूचा हंगाम येत आहे. यावर लस असूनही अनेक लोकांचा, काही वेळा एक लाखांवर लोकांचा या फ्लू मुळे मृत्यूमुखी पडतात. यावेळी आपण आपला देश बंद करतो का? नाही. आपण जसं कोरोनासोबत जगायला शिकत आहोत तसेच आपल्याला त्याच्या सोबत जगायला शिकलं पाहिजे.' असे ट्विट अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी केले होते. सोमवारी ट्रम्प यांनी लोकांना कोरोनाला घाबरू नका असा संदेश दिला होता. ते अजूनही कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यांनी फोटो देण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क काढला होता. सीएनएनच्या एका वृ्त्तानुसार आदल्या दिवशी फेसबुकनेही त्यांच्या वॉलवरून डोनाल्ड ट्रंप यांची यासंबंधीची पोस्ट काढून टाकली होती. 2019-20 च्या एनफ्लूएंझा हंगामात फ्लूमुळे जवळपास 22,000 लोकांचा मृत्यू झाला होता असे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज् कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा अहवाल सांगतो. कोरोना व्हायरसमुळे एकट्या अमेरिकेत दोन लाखांहून जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलिनिया ट्रंम्प यांच्यासहित व्हाईट हाऊस मधील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरी केलेग मॅकेनी यांनीही त्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे सांगितले.य याआधीही आपल्या ट्विटत आणि फेसबुक या सोशल माध्यंमावरच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे ़डोनाल्ड ट्रंम्प अनेकदा अडचणीत आले आहेत. त्यावर त्यांना अनेकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. यापूर्वी फेसबुकने त्यांच्या अनेक वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्या आहेत तसेच ट्विटरनेही त्यांच्या बऱ्याच वादग्रस्त ट्विटना लाल झेंडा दाखवला आहे. डोनाल्ड ट्रंम्प यांनी सुरवातीपासूनच कोरोनाला गांभीर्याने घेतले नसल्याचे अनेक स्तरातून बोललं जातय. ते ज्या-ज्या वेळी पत्रकार परिषदेला सामोरे जायचे तेंव्हा ते स्वत: कधीही मास्क वापरायचे नाहीत. त्यांच्या या कृत्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
ABP Majha Top 10, 13 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 13 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget