Tuljabhavani Temple Trust: पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी आईचा मायेचा हात; मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांचा निधी, महिलांना 1000 साड्यांचे वाटप
Dharashiv: तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचे वाटप केले जाणार आहे.

Marathwada Flood : गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपल्याचे चित्र आहे. असे असताना आता पुन्हा पावसाचे काळे ढग अधिक गडद झाल्याने (Marathwada Rain) मराठवाड्यातील धाराशिव, बीड ,लातूर, हिंगोली, परभणीसह इतर जिल्ह्यांमध्ये सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कधी नव्हे तो ओला दुष्काळ मराठवाड्याच्या (Maharashtra Flood) वाट्याला आल्याचे चित्र असून या अतिवृत्तीने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. शाशनाकडून नुकसानीचे पंचनामे आणि इतर मदत प्रक्रिया सुरु असताना मराठवाड्यातील अनेक भागातील पुराची (Flood)दाहकता आता समोर येऊ लागल्यानंतर राज्यभरातून मदतीचाही ओघ येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान (Tuljabhavani Temple Trust Flood) देखील सरसावले आहे.
पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचे वाटप, शेतकऱ्यांसाठीही मदतीचा नियोजन (Tuljabhavani Temple Trust Help)
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचे देखील वाटप केले जाणार आहे. महापुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी, वाहून गेलेली जनावरे अशा गरजू शेतकऱ्यांना ही मदतीचा संस्थांकडून नियोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयाच्या मार्फत हि मदत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अतिवृष्टीमुळे करमाळा आणि माढा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यात ही माढामध्ये मोठं नुकसान झालंय. या भागात मागील 8 दिवसात बचावकार्य करण्यात आलं. वारीमुळे आपल्याकडे यंत्रणा होती. शिवाय कोल्हापूर, सांगली, लातूर आणि पुण्यातून बोटी मागवली असून एनडीआरएफच्या 2 टीम देखील बोलावल्या आहेत. एकूण 25 बोटं आणि 180 लोकांनी बचावकार्य केलंय. माढा तालुक्यातील दरफळ आणि सुलतानपूरला परिस्थिती बिकट होती. धोका खूप जास्त होता. सध्या 72 ठिकाणी शेल्टर होम सुरु केलं आहे. त्यात सर्व सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अनेक ग्रामस्थ स्वतःहून अनेक ठिकाणी मदत कार्य करत आहे. प्रत्येक शेल्टर होमसाठी आम्ही एक नोडलं ऑफिसर टीम केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
Heavy Rains Damage Crops : धाराशिवमध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांचा 'आता जगायचं कसं?' प्रश्न
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मन सुन्न करणारी कहाणी समोर आली आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन (Soybean) पीक पावसाने हिरावून घेतले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी साचले आहे. चिखलातून हे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. "आता जगायचं कसं?" असा प्रश्न धाराशिवमधील शेतकरी विचारत आहेत. सोयाबीनसाठी प्रति एकर पंचवीस हजार रुपये खर्च येतो. दिवाळी, मुलांच्या शाळेची फी आणि पुढील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची पेरणी सोयाबीनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असते. मात्र, पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचा संसार कोरडा पडला आहे. सरकारने सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि पुढील पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. मंडळाधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी, सततच्या पावसामुळे पंचनामे करणे कठीण होत आहे.
हे हि वाचा


















