Zero Shadow Day 2022 : कल्याण, परभणीकरांना अनुभवला आज 'बिनसावलीचा दिवस'
Zero Shadow Day 2022 : उन्हातून जाताना कायम आपल्याबरोबर राहणारी सावली सोमवारी मात्र कल्याण, परभणीमध्ये काही वेळासाठी नाहीशी झाली
Zero Shadow Day 2022 : उन्हातून जाताना कायम आपल्याबरोबर राहणारी सावली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असे म्हटले जाते. परंतु, वर्षातून दोन दिवस असे येतात की, या दिवशी आपली सावली आपली साथ सोडते. आज असचं काहीसं चित्र कल्याण, परभणीकरांनी अनुभवले आहे.
कल्याणकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस
आज कल्याण डोंबिवलीकरांना 'शून्य सावली दिवस' अनुभवता आले आहे. आपल्या आजूबाजूला खेळणारी सावली काही क्षणांसाठी आपली साथ सोडून जाते. हे कुतूहल अनुभवण्यासाठी सुभेदारवाडा कट्टा या संस्थेच्या माध्यमातून सुभाष मैदानात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गजानन विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक पालकांनी सहभाग घेतला होता.
परभणीत सावलीने काही वेळेसाठी सोडली साथ
परभणीत अनेक ठिकाणी सावली सोडण्याची अनुभव आज अनेकांनी घेतला आहे. दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी सूर्य पूर्णपणे डोक्यावर आला ज्याने आपली सावली ही थेट पायाखाली जाते आणि एरवी इतरत्र दिसणारी सोबत चालणारी सावली काही वेळासाठी दिसेनाशी झाली.
जाणून घ्या महाराष्ट्रातील शून्य सावलीचे दिवस
- ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण , पैठण 17 मे
- संभाजीनगर , जालना, हिंगोली, चंद्रपूर 19 मे
- नाशिक, वाशीम, गडचिरोली 20 मे
- बुलढाणा, यवतमाळ 21 मे
- वर्धा 22 मे
- धुळे, अकोला, अमरावती 23 मे
- भुसावळ , जळगांव, नागपूर 24 मे
- नंदुरबार 25 मे
शून्य सावली कशी अनुभवाल?
आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते.
भर दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर
वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भर दुपारीही आपली थोडीतरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर असतो त्यामुळे आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.