Viral Video : 2022 वर्षामधील मारहाणीचे 5 व्हायरल व्हिडीओ, ज्यांनी नेटकऱ्यांचे वेधलं लक्ष
Viral Videos of 2022 : सोशल मीडियावर 2022 वर्षात अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या वर्षातील मारहाणीचे 5 चर्चेत राहिलेले व्हिडीओ पाहा.
Worst Flight Fight Viral Videos 2022 : सोशल मीडिया (Social Media) हे मनोरंजनाचं उत्तम साधन बनले आहे. सोशल मीडियावर कोणताही फोटो किंवा व्हिडीओ अवघ्या काही क्षणांत व्हायरल होतो. 2022 वर्षातही इंटरनेटवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. 2022 वर्षात विमानातील भांडणे आणि हाणामारीचे काही व्हिडीओ फार चर्चेत होते. या व्हायरल व्हिडीओमधील 5 सर्वाधिक व्हायरल झालेले आणि चर्चेत आलेले व्हिडीओ येथे पाहा.
1. अभिनेता आर्या बब्बर आणि गो एअर पायलटमधील वाद
अभिनेता आर्या बब्बर यांच्यासोबत घडलेली घटना सोशल मीडियावर चर्चेत होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये हिंदी-पंजाबी अभिनेता आर्या बब्बरने गो फर्स्ट (GoFirst) फ्लाइटमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. सुमारे 4 मिनिटांचा व्हिडीओ होता. आर्या बब्बर आणि पायलट यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं. आर्या त्याच्या मित्रांसोबत मस्ती करताना बोलतो की, 'ये क्या चलेगा'. पायलटला असे वाटते की, आर्या त्याला उद्देशून हे बोलला आहे. यावरून पायलट भडकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
2. एका प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटला मारहाण केली
सप्टेंबर महिन्यामधील ही घटना आहे. कॅलिफोर्नियातील एका प्रवाशाने अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंटला धक्काबुक्की केली. अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 377 मधील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विमानाने उड्डाण केल्यावर प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटकडे कॉफी मागितली. फ्लाइट अटेंडंटने कॉफी आणतो, असे सांगून गेल्यावर प्रवासी वाट पाहावी लागतेय म्हणून अटेंडंटवर भडकला आणि त्याने पुरुष फ्लाइट अटेंडंटच्या मागून जाऊन त्याला जोरदार ठोसा लगावला.
— DTX Daily (@dtxdaily) August 11, 2022
3. स्पिरिट एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याला महिला प्रवाशांशी भांडण
स्पिरिट एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याचे महिला प्रवाशासोबत झालेल्या भांडणाचा व्हिडी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. नंतर स्पिरिट एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याला विमानतळावर महिला प्रवाशांशी भांडण केल्यामुळे निलंबित करण्यात आले. टेक्सासच्या डॅलस फोर्ट वर्थ विमानतळावर ही घटना घडली होती. फ्लाइटमध्ये बसण्याच्या जागोवरून यांच्यात भांडण सुरू झाले होते.
— DTX Daily (@dtxdaily) August 11, 2022
4. इंडिगोमधील एअर होस्टेस आणि प्रवाशाच्या भांडणाचा व्हिडीओ
डिसेंबर महिन्यामध्ये इंडिगोमधील एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) आणि प्रवाशाच्या भांडणाचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला होता. या दोघांमध्ये जेवणावरून वाद झाल्याचे व्हिडीओतील संभाषणावरून दिसत आहे. एअर होस्टेसने प्रवाशाला हवं ते जेवण न मिळाल्याने त्याने एअर होस्टेससोबत आवाज वाढवून बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर एअर होस्टेसने प्रवाशाला उत्तर देत मी तुमची नोकर नाहीय असे म्हटले. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.
Full marks to this lady for standing up @IndiGo6E shld reward and promote her…Seen too much of this ‘you are my servant behaviour’…glad she called it out #womenpower pic.twitter.com/YmBysxNl3m
— Parvin Dabas (@parvindabas) December 22, 2022
5. थाय स्माइल एअरवेजच्या विमानात प्रवाशांमध्ये तुफान राडा
बँकॉकहून कोलकाताकडे येणाऱ्या थाय स्माइल एअरवेजच्या विमानामध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन प्रवाशांमध्ये आधी वाद झाला, त्यानंतर एक प्रवासी आणि त्याच्या मित्रांनी मिळून दुसऱ्या प्रवाशाला बेदम मारहाण केली. आकाशातील हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. ही घटना 27 डिसेंबर रोजी घडली होती.
बैंकॉक-भारत के बीच उड़ान भरने वाली Thai Smile Airway की फ्लाइट में यात्रियों के बीच हुई भिड़ंत।
— Kaushik Kanthecha (@Kaushikdd) December 28, 2022
"फलाइट में फाइट"
यात्रियों के बीच मारपीट, वीडियो वायरल, विडियो कबका है उसकी पुष्टि नही हो पाई। pic.twitter.com/V1jAikIQS7