Viral Video : चेंडा मेलम आणि व्हॉयोलिनचे सुरेख मिश्रण, तरुणीने वाजवलं इलियाराजाचं सुपरहिट गाणं, केरळमधील व्हिडीओ व्हायरल
Kerala Viral Video: इलियाराजाचे तामिळ हिट गाणं असलेल्या 'मंग्युइले पोंगुयिले' (Manguyile Poonguyile) या धूनवर या तरुणीने गाणं वाजवलं असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
तिरुअनंतरपुरम: संगीत ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपला मूड एकदम बदलून जातो, आपण काही वेळ स्वतःला विसरुन जातो. संगीताची प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, कुणाला सॉफ्ट संगीत आवडतं, तर कुणाला थिरकवणारं संगीत आवडतं. अलिकडच्या पीढीचा पॉप किंवा पाश्चात्य संगीताकडे कल असतो. पण काही संगीत किंवा पारंपरिक वाद्य अशी असतात की तुम्हाला मंत्रमुग्ध करतात. मग जर आधुनिक आणि पारंपरिक संगीताचा मेळ बसवला तर? केरळमधील असाच एक आधुनिक आणि पारंपरिक संगीताचा मेळ घालणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Kerala Viral Video) होत आहे. या व्हिडीओत ज्या प्रकारे नवीन आणि जुन्या वाद्यांचा असा मिलाफ घडला आहे, तो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्यांना संगीताची थोडीफार जाण आहे त्यांना पारंपारिक वाद्यांची आणि आधुनिक वाद्यांची ही जुगलबंदी नक्कीच साद घालेल.
Woman In Kerala Plays Violin : चेंडा मेलमसह व्हायोलिन वाजवलं
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक तरुणी चेंडा मेलम (Chenda Melam) या केरळमधील पारंपरिक वाद्यासह व्हायोलिन ड्युएट वाजवताना दिसत आहे. चेंडा मेलम आणि व्हायोलिनचे हे मिश्रण केरळमधील एका मंदिरातील उत्सवादरम्यान आर्यकार बंधूंनी सादर केले. विशेष म्हणजे हे गाणं इलियाराजाचं तामिळ सुपरहिट साँग आहे.
— സെബിച്ചൻ (@sebi_mathew) May 25, 2023
हे गाणं चांगलंच मंत्रमुग्ध करणारं असून सोशल मीडियावर सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. व्हॉयोलिन वाजवणारी ही महिला चांगलीच सुरात वाजवत आहे, तर तिच्या मागे चेंडा मेलमचा मोठा ग्रुप दिसतोय. या दोघांनीही ताला-सुरात हे गीत वाजवल्याचं दिसून येतंय.
चेंडा मेलम हा केरळमधील संगिताचा एक प्रकार असून त्यामध्ये सर्व कलाकार पारंपारिक वाद्यांसह संगीत वाजवतात. दक्षिण भारतातील विशेषत: केरळमधील मंदिरांमध्ये विशेष सणांच्या वेळी चेंडा मेलम वाजवण्यात येतं.
Chenda Melam Viral Video: व्हिडीओ प्रचंड व्हायरल
चेंडा मेलम आणि व्हायोलिनची ही साथ संगीतप्रेमी नेटिझन्सच्या पसंतीस उतरली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की ही धून त्याला खूपच आवडली. काहीजणांनी हा अत्यंत सुंदर व्हिडीओ असून, मंत्रमुग्ध करणारा असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ एकदाच नव्हे तर सातत्याने पाहावा वाटतोय, ही धून सातत्याने ऐकावी वाटतेय असं एका यूजरने कमेंट केली आहे.
ही बातमी वाचा: