(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pigeon Messenge : जुन्या काळात पत्र पाठवण्यासाठी कबूतराचा वापर का केला जायचा? 'या' मागचं रंजक कारण वाचा
Pigeon Letter Carrier : पूर्वीच्या काळात पत्र पाठवण्याचं कामासाठी कबुतराचा वापर व्हायचा. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके पक्षी असताना या कामासाठी फक्त कबूतराची निवड का करण्यात आली?
Pigeon Messenge Facts : 'कबूतर जा, जा, जा' हे बॉलिवूड गाणं बहुतेकांनाच माहित असेल. पूर्वी कबूतरामार्फत ( Pigeon ) पत्र पाठवलं जातं असे. अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, कबूतर पत्र पोहोचवण्याचं काम ( Pigeon As Messenger ) करायचे. अनेक गाण्यांमध्येही कबुतर एखादं पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना तुम्ही पाहिलं असेल. कबूतर हा पक्षी फार हुशार आहे. कबूतरं पत्र योग्य ठिकाणी पत्र पोहोचवून निश्चित ठिकाणी परत यायची.
पत्र पाठवण्याच्या कामासाठी कबुतराचा वापर
पूर्वीच्या काळात पत्र पाठवण्याच्या कामासाठी कबुतराचा वापर व्हायचा. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके पक्षी असताना या कामासाठी फक्त कबूतराची निवड का ( Why Pigeon is Messenger ) करण्यात आली? तर त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. या वैज्ञानिक कारणामुळे तुम्हाला समजेल की, पत्र पोहोचवण्याच्या कामासाठी कबूतराची निवड कशी झाली.
'या' कामासाठी कबूतराची निवड कशी झाली?
यामागचं कारण म्हणजे कबुतरामध्ये असणार एक विशेष गुण आहे. कबूतर हा पक्षी अत्यंत हुशार आहे. कबूतरामध्ये मार्ग चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्याच्याकडे मार्ग लक्षात ठेवण्याची क्षमता आहे. कबूतर त्यांच्या मार्ग शोधण्याच्या विशेष क्षमतेसाठी ओळखले जातात. कबूतर स्वतःचा मार्ग शोधतं पत्र पोहोचवण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडायचे. शतकानुशतके कबूतरांनी ही कामगिरी केली.
कबूतरामध्ये आहे खास गुण
कबूतरांच्या शरीरात खास 'जीपीएस यंत्रणा' असल्याचं मानलं जातं. कबुतराच्या मार्ग लक्षात ठेवण्याच्या या विशेष गुणाचा उल्लेख सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीही करण्यात आला होता. प्रसिद्ध रोम सैनिक ज्युलियस सीझर यांनी कबुतराचा उल्लेख केला होता. ज्युलियस सीझरने कबूतरांद्वारे रोमला गॉलच्या विजयाची बातमी पाठवली असं सांगितलं जातं. तसेच नेपोलियन बोनापार्टने 1815 मध्ये वॉटरलूच्या लढाईत इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर याचप्रकारे पत्र पोहोचवलं होतं.
GPS प्रमाणे काम करणारा पेशींचा समूह
एका मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांना कबुतराच्या मेंदूमध्ये 53 पेशींचा एक समूह आढळला. हा पेशांचा समूह कबूतरांना दिशा ओळखण्यात आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ठरवण्यात मदत करतो. हा पेशींचा समूह जीपीएस यंत्रणेप्रमाणे काम करतो. या समुहातील प्रत्येक पेशी विविध दिशा ओळखू शकते. अहवालात असं सांगण्यात आलं की, या कबुतराच्या शरीरातील या पेशी दिशानिर्देशांची माहिती देतात त्यानुसार कबूतर काम करते.