एक्स्प्लोर

Sachin Tendulkar Net Worth: निवृत्तीनंतर काय करत आहे 'सचिन तेंडुलकर', किती आहे संपत्ती? जाणून घ्या

Sachin Tendulkar Net Worth: भारतीय लोकांना जितकी क्रिकेटची आवड आहे, तितकी जगात कुठल्याच देशात दिसत नाही. जेव्हा भारतीय क्रिकेटचा विचार केला जातो, तेव्हा त्या खेळाडूंचे नाव सर्वात आधी ध्यानात येते, ज्यांची लोक देवाप्रमाणे पूजा करतात.

Sachin Tendulkar Net Worth: भारतीय लोकांना जितकी क्रिकेटची आवड आहे, तितकी जगात कुठल्याच देशात दिसत नाही. जेव्हा भारतीय क्रिकेटचा विचार केला जातो, तेव्हा त्या खेळाडूंचे नाव सर्वात आधी ध्यानात येते, ज्यांची लोक देवाप्रमाणे पूजा करतात. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो म्हणजे 'गॉड ऑफ क्रिकेट' सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता, लोकांचे सचिनबद्दलचे  (Sachin Tendulkar) प्रेम आणि आदर जसा त्याला क्रिकेटच्या मैदानात मिळत होता, तसाच आजही आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अनेक सामने जिंकून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सचिनने त्याच्या बॅटने जितक्या धावा केल्या, त्याच्या दुप्पट त्याने प्रसिद्धी आणि पैसे कमावला. निवृत्तीनंतरही सचिन लक्झरी लाइफचा आनंद घेत आहे. तो 100 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहत असून वर्षाला करोडो रुपये कमावत आहे. पण निवृत्तीनंतर त्याच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, तर आज आपण  सचिन तेंडुलकरची कमाई, घर, कार आणि एकूण संपत्ती याविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत. 

Sachin Tendulkar Net Worth – Career : सचिन तेंडुलकरची कारकीर्द

सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर होते. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या दुनियेत पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये एकामागून एक अनेक विक्रम केले. 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनला मास्टर ब्लास्टर म्हटले जाऊ लागले. तो क्रिकेटचा दिग्गज बनला. सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Sachin Tendulkar House in Mumbai: 100 कोटींच्या घरात राहतो सचिन तेंडुलकर

सचिनने (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची कीर्ती अजूनही कायम आहे. सचिन मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो. हा बंगला सचिनने 2007 मध्ये खरेदी केला होता. तेव्हा या बंगल्याची किंमत 39 कोटी रुपये होती, मात्र आज सचिनच्या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटींवर पोहोचली आहे. सचिनच्या आलिशान घरात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. याशिवाय सचिनचा (Sachin Tendulkar) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळमध्ये सचिन तेंडुलकरचे वॉटर फेसिंग घर आहे. या घराची किंमत सुमारे 78 कोटी रुपये आहे.

Source of Sachin Tendulkar's Earnings: सचिन तेंडुलकरच्या कमाईचा स्रोत

सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो स्वतःमध्ये एक ब्रँड आहे. भारतासोबतच सचिनने (Sachin Tendulkar) अनेक परदेशी कंपन्यांच्या ब्रँडशी करार केला आहे. सचिन ब्रँड एंडोर्समेंट, गुंतवणूक आणि हॉटेल व्यवसायातून मोठी कमाई करतो. सचिनचे मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोन रेस्टॉरंट आहेत. याशिवाय सचिनला पेन्शनही मिळते. अशा प्रकारे सचिन एका महिन्यात 4 कोटींहून अधिक आणि वार्षिक 50 कोटींहून अधिक कमावतो.

Sachin Tendulkar's Pension: सचिन तेंडुलकरची पेन्शन

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) दरमहा 50 हजार रुपये पेन्शन म्हणून देते. याशिवाय सचिनला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही मिळाला आहे. त्यातूनही त्याला दरमहा पेन्शनची रक्कम मिळते. तसे पाहता सचिनला पद्मविभूषण, पद्मश्री, अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Sachin Tendulkar Net Worth: सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 150 मिलियन डॉलर्स इतकी आहे. सचिनकडे (Sachin Tendulkar) भारतीय चलनात एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सचिन तेंडुलकर हा कोची ISL नावाच्या फुटबॉल संघाचा मालक आहे, जो इंडियन सुपर लीग फुटबॉलमधील संघ आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील बेंगळुरू ब्लास्टर्स संघाचाही तो मालक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra NewsPrayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.