जुळ्या मुलांना जन्म देणार होती महिला; पण चुकीच्या औषधांमुळे दोघांचा मृत्यू, पाहा नेमकं घडलं काय?
World News: औषधं खरेदी करताना नेहमी आपण जे औषध घेत आहोत, ते बरोबर आहे की नाही? हे तपासलं पाहिजे. चुकीच्या औषधामुळे अमेरिकेतील महिलेसोबत अतिशय दुर्दैवी घटना घडली.
![जुळ्या मुलांना जन्म देणार होती महिला; पण चुकीच्या औषधांमुळे दोघांचा मृत्यू, पाहा नेमकं घडलं काय? weird news marathi mother lost unborn twin baby pharmacy gave her abortion pills जुळ्या मुलांना जन्म देणार होती महिला; पण चुकीच्या औषधांमुळे दोघांचा मृत्यू, पाहा नेमकं घडलं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/e5a017ace68c073e1dde8ee7e362c9481677492096038579_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
World News: अमेरिकेत एका मेडिकलवाल्याने महिलेला चुकून गर्भनिरोधक गोळ्या (Abortion Pills) दिल्या, त्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटात वाढणाऱ्या दोन जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. टिमिका थॉमस नावाची ही महिला अमेरिकेतील (America) लास वेगास (Las Vegas) शहरातील रहिवासी आहे. महिलेने 2019 मध्येच आई होण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 30 वर्षांपेक्षा जास्त वयामुळे आणि आधीच अनेक ऑपरेशन्स झाल्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं.
पुन्हा आई बनण्याचं स्वप्न अपूर्णच
गर्भवती राहण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महिला आणि तिच्या पतीने आयव्हीएफद्वारे (IVF) मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया खूप महाग आहे. शिवाय, हे कुटुंब फार श्रीमंतही नव्हतं. मात्र, या सर्व आव्हानांना न जुमानता चार मुलांच्या पालकांनी आपण पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या आनंदावर अशा प्रकारे प्रकोप होईल आणि त्यांचं आयुष्य असं उद्ध्वस्त होईल, हे त्यांना माहीत नव्हतं.
IVF प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला डिस्चार्ज
डॉक्टरांनी महिलेवर IVF प्रक्रिया पूर्ण केली आणि नंतर औषधं लिहून दिली, त्यानंतर महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. लिहून दिलेल्या औषधांमध्ये हार्मोनचं उत्पादन वाढवणारं एक औषध होतं, जेणेकरून गर्भधारणा सुरू होईल. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ही महिला लास वेगासमधील औषधांच्या दुकानात गेली आणि तिथून तिने औषधं खरेदी केली. स्त्री आणि तिच्या पतीला वाटलं की, आता ते लवकरच पालक बनतील.
चुकीचं औषध घेतल्याने बाळांचा मृत्यू
द मिररच्या रिपोर्टनुसार, टिमिकाने औषधाचे दोन डोस घेतले आणि तिला वाटू लागलं की, काहीतरी गडबड आहे. तिने सांगितलं की, औषध घेतल्यानंतर तिला खूप वेदना होऊ लागल्या. मग टिमिकाने औषध पाहिलं तेव्हा तिला समजलं की, तिने घेतलेलं औषध खरं तर गर्भपातासाठी (Abortion) होतं. अशातच त्या एका गोळीमुळे तिच्या पोटात वाढणारी जुळी मुलं मरण पावली. हा प्रकार महिलेला समजताच ती जोरजोरात रडू लागली.
एवढी मोठी चूक कशी झाली?
वास्तविक, महिलेने ज्या मेडिकलमधून औषध घेतलं होतं. तेथे दोन तंत्रज्ञ आणि दोन फार्मासिस्ट यांनी औषधांचा कॅटलॉग तयार करताना चूक केली. यामुळेच टिमिका जेव्हा औषध घेण्यासाठी गेली, तेव्हा कॅटलॉगमध्ये चूक झाल्याने तिला चुकीचं औषध देण्यात आलं.
मेडिकलवर गुन्हा, 8 लाखांची नुकसान भरपाई
यानंतर औषध दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवाडा स्टेट बोर्ड ऑफ फार्मसीने दुकानमालकाला 10 हजार डॉलर्स, म्हणजेच सुमारे आठ लाख रुपयांची भरपाई महिलेला देण्यास सांगितलं आहे.
हेही वाचा:
लग्नाची जंगी पार्टी... लाखोंचं बिल देण्याची वेळ येताच नवरा-नवरी फरार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)