Viral Video : उद्घाटन होताच क्षणार्धात कोसळला पूल, अधिकाऱ्यांना मिळाली भ्रष्टाचाराची शिक्षा, काय घडलं?
Viral Video : पूलाचे उद्घाटन होताच काही सेंकदातच मोठी दुर्घटना घडते. आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहा...
Viral Video : देशात ठिकठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून पूल, टोलेजंग इमारती तसेच मोठमोठे रस्ते बांधण्यात येतात. पण याच बांधलेल्या वास्तू अवघ्या काही दिवसांतच खराब होऊ लागतात, याचे कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचे काम, यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असण्याचाही संभव असतो. अशातच अनेक देशात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हे पाहून लोकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. अशीच एक घटना डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधून (Democratic Republic of Congo) समोर आली आहे, जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या ठिकाणी पूलाचे उद्घाटन होताच काही सेंकदातच मोठी दुर्घटना घडते. आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहा...
View this post on Instagram
उद्घाटन करणारे मान्यवर ज्या पूलावर उभे होते, नेमका तोच पूल कोसळला आणि मग...
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एका पुलाचे उद्घाटन करण्यासाठी लोकं जमली आहेत. यावेळी पुलाचे उद्घाटन करताना मान्यवर दिसत आहेत. मात्र पुलाचे उद्घाटन होताच अवघ्या काही क्षणातच हा पूल कोसळतो. त्यानंतर जमलेल्या नागरिकांचा एकच गोंधळ सुरू होतो. कारण उद्घाटन करणारे मान्यवर ज्या पूलावर उभे होते, नेमका तोच पूल कोसळला. आणि मग..
उद्घाटन समारंभात एक मोठी दुर्घटना
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोची राजधानी किन्शासा येथे एका पुलाच्या उद्घाटन समारंभात एक मोठी दुर्घटना घडली. आणि ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला, काँगोच्या राजधानीत एका फूटब्रिजचे उद्घाटन करण्यासाठी काही लोक जमले होते, असे सांगण्यात येत आहे. पुलाचे उद्घाटन करत असतानाचा मान्यवरांनी रिबन कापताच पूल कोसळला. आणि होत्याचे नव्हते झाले.
यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया
पूल कोसळल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. पुलाच्या बांधकामात किती निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते, याचा अंदाज आपण हा व्हिडीओ पाहून लावू शकतो. काही मोजक्याच लोकांचे वजन पडताच हा पूल क्षणार्धात कोसळला. या व्हिडीओवर यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
इतर बातम्या