VIDEO: करंट लागल्याने रस्त्यावर तडफडत होती मुलगी; वृद्धाने हिंमत दाखवून वाचवले प्राण, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: मृत्यूच्या दारातून परतलेल्या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृद्धाने हिंमत दाखवून कसे मुलीचे प्राण वाचवले, पाहूया.
Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ फार मजेदार (Funny Videos) असतात, जे पाहून मन प्रसन्न होतं आणि मनोरंजन (Entertainment) देखील होतं, पण काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. कशी एक लहान मुलगी मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावून मागे आली, याचा अंदाज तुम्हाला व्हिडीओ पाहून येईल.
सोशल मीडियावर मन हेलावणारा व्हिडीओ व्हायरल
एक लहान मुलगी रस्ता ओलांडत असताना अचानक तिला पाण्यातून करंट लागतो, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत हे दृश्य सरळ दिसत आहेत. रस्त्यावर उपस्थित असलेले इतर लोक मुलीला वाचवण्यासाठी पुढे सरसावतात, परंतु पहिल्या व्यक्तीला तिच्याजवळ जाताच पाण्यातून वाहणारा करंट जाणवतो आणि तो तसाच माघारी फिरतो. रस्त्यावरुन जाणारा दुसरा वयोवृद्ध कपड्याच्या सहाय्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेही अपयशी ठरतात.
वयोवृद्ध चिमुकलीसाठी झाला देवदूत
त्यानंतर वयोवृद्धाला दुसरा एक व्यक्ती लाकडाची काठी देतो. लाकडाच्या काठीच्या सहाय्याने हा वयोवृद्ध व्यक्ती त्या मुलीला करंटपासून मुक्त करतो आणि तिला खेचून तिचे जीव वाचवतो. ही चित्तथरारक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कुठे घडली? हे अद्याप कळू शकलेलं नाही.
Watch Viral Video: पानी में दौड़ा करंट, चपेट में आये बच्चे के लिए एक राहगीर बना मसीहा, सूझबूझ से बचाई जान#ViralVideos pic.twitter.com/qKifRFpUYp
— princy sahu (@princysahujst7) September 27, 2023
सोशल मीडिया युजर्स देत आहेत प्रतिक्रिया
या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत, काही जण याला मृत्यूला आमंत्रण देत मागे येणं म्हणत आहेत. तर काही लोक रस्त्यावरुन जात असलेल्या वृद्धाचं कौतुक करत आहेत, ज्याने या लहान मुलीचे प्राण वाचवले.
काही जण सूचित करत आहेत की, रस्त्यावरुन चालताना कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे नेहमी सावध राहावं. लक्ष देऊन रस्ता ओलांडावा. कोणताही अपघात होऊ नये, याची काळजी घ्यावी. कधी मृत्यू ओढावेल, हे सांगता येत नाही. असाच हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
हेही वाचा:
VIDEO: मुंबई लोकलमध्ये महिलांची 'दे दणादण'; एकमेकींचे केस खेचत धावत्या ट्रेनमध्ये तुफान राडा