एक्स्प्लोर

Viral Video : प्रियकराने मृत प्रेयसीची मागणी केली पूर्ण, मृतदेहासोबत प्रियकराने केले लग्न, नेटकरी झाले भावूक 

Viral Video : आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी काही लोकं सर्व मर्यादा ओलांडतात. आसाममधील एका तरुणाची अशीच काहीशी कहाणी चर्चेत आहे

Viral Video : प्रेमाला (Love Story) सीमा नसते, आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी काही लोकं सर्व मर्यादा ओलांडतात. आसाममधील एका तरुणाची अशीच काहीशी कहाणी चर्चेत आहे, ज्याने आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी समाजाचे सर्व नियम धाब्यावर बसवले. तरुणाने आपल्या मृत प्रेयसीची मागणी पूर्ण करून केवळ लग्नच केले नाही, तर आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथही घेतली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रेयसीच्या मृतदेहापाशी प्रियकर ढसाढसा रडला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसाममधील मोरीगाव येथील रहिवासी 27 वर्षाचा बिटुपन तामुली आणि चपरमुख येथील कोसुआ गावातील 24 वर्षाची प्रार्थना बोरा हे अनेक दिवसांपासून प्रेमात होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या प्रार्थनाला गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. बिटुपनला त्याच्या मृत्यूची बातमी कळताच तो हादरला. यानंतर, ताबडतोब तिच्या घरी पोहोचला आणि तिची वधू बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या मृतदेहाशी लग्न केले. तिच्या मृतदेहापाशी बिटुपन ढसाढसा रडला.

येथे पाहा व्हिडिओ, जेव्हा प्रियकराने मृत प्रेयसीकडे मोठी मागणी केली पूर्ण

एका खासगी टीव्हीच्या रिपोर्टनुसार, प्रार्थना आणि बिटुपन खूप दिवसांपासून प्रेमात होते. दोघांनाही लवकरच लग्न करायचे होते. मात्र प्रार्थनाची तब्येत अचानक बिघडल्याने तिला 18 नोव्हेंबरला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. वृत्तानुसार, बिटुपनने पुन्हा कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली आहे.

अनोखे प्रेम पाहून संपूर्ण कुटुंबाचे हृदय पिळवटले

प्रार्थनाच्या नातेवाईकांनी सांगितले की, दोघांच्या घरच्यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती. या नात्याने आम्ही सर्वजण आनंदी होतो, पण नंतर आमच्या आनंदाला ग्रहण लागले. प्रार्थनेच्या अंतिम संस्कारावेळी बिटुपन खूप भावूक झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे हे अनोखे प्रेम पाहून संपूर्ण कुटुंबाचे हृदय अश्रूंनी भरून आले. या घटनेची व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या प्रेमाला खरे प्रेम म्हणत आहे. बिटुपनने पुन्हा कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली आहे

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bride Groom Video : नवरदेवाने भरमंडपात केली नवरीची मस्करी, पुढे काय झालं तुम्हीच पाहा; व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget