Viral Video : 56 वर्षीय सासू बनली फिटनेस फ्रिक! साडी नेसून जिममध्ये वर्कआउट, नेटकरी आश्चर्यचकित!
Trending Video : एका 56 वर्षीय महिलेचा साडी नेसून जीममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
![Viral Video : 56 वर्षीय सासू बनली फिटनेस फ्रिक! साडी नेसून जिममध्ये वर्कआउट, नेटकरी आश्चर्यचकित! Viral Video marathi news 56 years old woman workout in gym wearing saree inspirational Viral Video : 56 वर्षीय सासू बनली फिटनेस फ्रिक! साडी नेसून जिममध्ये वर्कआउट, नेटकरी आश्चर्यचकित!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/22/66499c75caa46ba616a4951c85b54bad1669084039087381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending Video : माणसं वयोवृद्ध (Senior Citizen) झाली की, ती त्यानुसार आपल्या शरीराची काळजी घेतात. अनेकजण डाएटकडे लक्ष देतात, तर अनेकजण थोडाफार व्यायाम करतात, वाढत्या वयात चांगल्या सवयी अंगीकारणं अधिक गरजेचं होऊन बसतं, ज्या तुमच्या शरीराला अधिक मजबूत आणि सक्रिय ठेवतात. अलीकडेच चेन्नईच्या जिममधील एका 56 वर्षीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
View this post on Instagram
गुडघेदुखीवर केली मात
निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहारासोबतच व्यायाम आणि आनंदी राहणेही आवश्यक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु फार कमी लोक ते प्रत्यक्षात आणू शकतात. अशा स्थितीत विविध प्रकारच्या शारीरिक समस्याही लोकांना भेडसावू लागतात. एका 56 वर्षीय महिलेला गुडघे आणि पायांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर तिने जिममध्ये वर्कआऊट करायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा तिलाही झाला.
सूनेसोबत जिममध्ये वर्कआऊट करणारी सासू! नेटकरी म्हणाले 'सलाम'
खरंतर ही 56 वर्षीय महिला जीममध्ये साडी नेसून घाम गाळत आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. ती साडी नेसून जड वजन, डंबेल, इतर विविध जिम मशीन उचलताना दिसते. आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे ही महिला तिच्या सूनेसोबत वर्कआऊट करते. व्हिडीओच्या शेवटी, जिममधील इतर महिलांसह कर्मचारी सदस्यांद्वारे महिलेचा सत्कार केला जातो. ही महिला म्हणते, माझे ऐका मी नियमित व्यायाम करते. मी 52 वर्षांचा असताना पहिल्यांदा जिमला जायला सुरू केले.
सुनेसोबत पॉवरलिफ्टिंग आणि स्क्वॉट्स करते
महिला सांगते, जेव्हा मला कळले की माझ्या गुडघ्यात आणि पायात तीव्र वेदना होत आहेत, तेव्हा आजार सुरू झाले आहे. माझ्या डॉक्टरांनी उपचारात बरेच बदल केले, तसेच मला व्यायाम करण्याचा सल्ला दिला. सध्या मी माझ्या सुनेसोबत पॉवरलिफ्टिंग आणि स्क्वॉट्स करते, त्यामुळे माझ्या वेदना खूप कमी झाल्या आहेत. या महिलेला साडी नेसणे आणि जिम करायला आवडते असेही तिने सांगितले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)