![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Video Viral : एक हात नसतानाही त्याने नाही मानली हार, परिस्थितीचा सामना करत लढतोय जीवनाची लढाई! एकदा पाहाच
Video Viral : जीवनात कधीकधी परिस्थिती देखील माणसासमोर मोठमोठे आव्हान निर्माण करते.
![Video Viral : एक हात नसतानाही त्याने नाही मानली हार, परिस्थितीचा सामना करत लढतोय जीवनाची लढाई! एकदा पाहाच Viral Video despite not having hand the person did not give up strongly doing work marathi news Video Viral : एक हात नसतानाही त्याने नाही मानली हार, परिस्थितीचा सामना करत लढतोय जीवनाची लढाई! एकदा पाहाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/21/d2187e909c892e188eca83fe08af3b40_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Video Viral : परिस्थिती माणसाला खूप काही करायला लावते. अशा परिस्थितीत माणूस लढायलाही शिकतो आणि स्वत:ला सुधारण्याच्या उद्देशाने कामाला लागतो. मात्र जीवनात कधीकधी परिस्थिती देखील माणसासमोर मोठमोठे आव्हान निर्माण करते, परंतु या समस्यांना योग्यरित्या पार करणे देखील तितकीच महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे.
व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
आता परिस्थितीसमोर हार न मानणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांमध्ये अशी जिद्द असते की, ते प्रतिकूल परिस्थितीतही हार मानत नाहीत आणि त्या परिस्थितीसोबत कसे लढायचे ते देखील त्यांना माहित असते. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला हात नसूनही ती व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत असल्याचे दिसून येते.
View this post on Instagram
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या समस्या देखील छोट्या वाटतील
कधीकधी आपण आपल्या समस्यांसमोर हार मानतो. जणू काही आपल्या हातात आता काहीच उरले नाही, असा विचार आपण करतो, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या समस्या देखील छोट्या वाटू लागतील. व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव मितेश गुप्ता असून त्याला त्याचा एक हात अपघातात गमवावा लागला आहे.
तो हिंमत हारला नाही
या अपघातानंतरही तो हिंमत हारला नाही आणि आज मुंबईतील मालाडमध्ये पावभाजीचा स्टॉल चालवतो. त्यांच्या हिंमतीला सर्वजण सलाम करत आहेत. त्याचवेळी मितेशही मोठ्या जिद्दीवर जीवन जगत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर यूजर्स देखील त्याची खूप प्रशंसा आणि कौतुक करत आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)