Viral Video : मार्केटमध्ये रील्स बनवत होती मुलगी, मागे झिंगलेला व्यक्ती आला अन् नाचायला लागला
Girls Dance Viral Video : सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तिने चक्क मार्केटमध्ये डान्स सुरू केला, पण मागून आलेल्या व्यक्तीने असं काही केलं की तो व्हिडीओ मजेदार बनला.
मुंबई : इन्स्टाग्रामवर रील्स (Instagram Reels) आणि शार्ट व्हिडीओ बनवण्यासाठी लोक काय काय करतात. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, सर्वांनाच या रील्सने वेडं बनवलंय. मग त्यावर लाईक्स मिळवण्यासाठी काहीही केलं जातं, कुठेही शूट केलं जातं. मग काहीवेळा अशा शूटमध्ये काही जणांकडून व्यत्यय येतो, पण मग तो व्हिडीओ आणखीनच मजेशीर बनतो. असाच काहीसा प्रकार एका मुलीसोबत घडला आहे. ही मुलगी तिच्या रील्ससाठी चक्क मार्केटमध्ये नाचत होती, पण तिच्या मागे उभं राहून एका व्यक्तीने त्या व्हिडीओचा (Viral Video) पार चोथा करुन टाकला.
सोशल मीडियावर (Social Media) रील्स बनवण्याची क्रेझ तरुण आणि तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतंय. बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन, मेट्रो, मार्केट असो, नुसता कॅमेरा सुरू व्हायची गरज, मग ते कुठेही सुरू होतात. मग त्यानंतर अनेक मजेदार किस्से घडतात आणि ते व्हायरल होतात.
अशीच एक मुलगी सोशल मीडियासाठी रिल्स बनवत होती. त्यासाठी मार्केटमध्येच तीने डान्स (Girls Dance Viral Video) सुरु केला. आजूबाजूला लोकांची गर्दी होती. दिलबर- दिलबर या गाण्यावर तिने डान्स सुरू केला. पण तिच्या मागेच व्यक्तीनेही डान्स सुरू केला. त्या व्यक्तीने त्या मुलीच्या डान्सिंग स्टेप्स पाहून नाचायला सुरू केलं.
अच्छा है आजकल रोड साइड लोगों को कंपनी मिल जाती है pic.twitter.com/PoLcw8U5Vs
— 24 (@Chilled_Yogi) October 6, 2022
ती मुलगी एक-एक स्टेप्स सुरु करते, त्याचप्रमाणे खाकी रंगाची कपडे घातलेल्या त्या व्यक्तीने नाचायला सुरू केलं. कॅमेराचं शूटिंग तसंच सुरू आहे. मग हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
त्या मुलीच्या डान्सिंग स्टेप्सची कॉपी करताना तो व्यक्ती मजेशीररित्या नाचत आहे. त्यावर काही लोकांनी कमेंट करत तो व्यक्ती दारू पिलेला अन् झिंगलेला आहे असं सांगितलं.
आतापर्यंत अनेक डान्स पाहिलेत, पण असं टॅलेंट पाहिलं नसल्याचं काही जणांनी कमेंट केलं. लोकांच्यात असलेल्या या टॅलेंटला बाहेर काढण्याची गरज असल्याची मजेशीर कमेंट अनेकांनी केल्या आहेत.
यूट्यूबवरची रेसीपी आणि खरी बनवलेली रेसीपी यामध्ये जे अंतर असतं तेच या दोन डान्समध्ये आहे अशी एका यूजरने कमेंट केली आहे.
I tried my best 😢 pic.twitter.com/SSZD4Qc1zU
— Rajabets India🇮🇳👑 (@smileandraja) October 7, 2022
महत्त्वाच्या बातम्या :
- Zomato : काय सांगता? झोमॅटोचे CEO दिपेंदर गोयल तुम्हाला फूड डिलिव्हरी करणार...
- Viral Video : साडी नेसून महिलांचा 'हुतूतू', व्हिडीओ पाहून नेटकरीही भारावले