(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral: मित्रांशी बोलता-बोलता 'असा' आला काळाचा घाला...तरुणाची अचानक एक्झिट, एकाएकी मित्रही स्तब्ध, व्हिडीओ व्हायरल
Viral: त्या तरुणाला माहित नव्हते की, असं काहीतरी त्याच्यासोबत होईल, घडलेल्या प्रकाराने त्याचे मित्रही स्तब्ध झालेत, घडलेलं दृश्य CCTV त कैद झालंय
Viral: ते म्हणतात ना... माणसाच्या आयुष्याचा काही भरवसा नाही. जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील घटना पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण एकाएकी असं काहीतरी घडलं, ज्यामुळे नेटकरी आश्चर्य व्यक्त करतायत, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही...
जन्म आणि मृत्यूवर कोणाचाच अधिकार नाही. जगात आकस्मिक मृत्यूची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मध्य प्रदेशातील रीवा येथून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एक माणूस आपल्या मित्रांसोबत बसला होता आणि त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. काही वेळातच तो अचानक तो खाली पडला आणि त्याला जीव गमवावा लागला. घडलेला हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसलाय.
MP : रीवा में दुकान के अंदर दोस्तों संग बात कर रहे 31 वर्षीय प्रकाश सिंह बघेल की हार्टअटैक से मौत हो गई। CCTV देखिए – pic.twitter.com/WcftzFppMn
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 25, 2024
मित्रांसोबत बोलत असताना अचानक मृत्यू
ही घटना 20 ऑक्टोबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. सिरमौर चौकाजवळील एका दुकानात हा तरुण मित्रांसोबत बसला होता. सगळे आपापसात बोलत होते. दरम्यान, एक व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडली. त्याचे सर्व मित्र हैराण झाले आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. अचानक नेमकं काय घडलं? हे कोणालाच समजू शकले नाही. त्या व्यक्तीची बिकट अवस्था पाहून त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रकाशसिंग बघेल (31, रा. बजरंग नगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने ते जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. , व्हिडिओ व्हायरल
कुटुंबियांचा विश्वासच बसत नव्हता..
या घटनेची माहिती प्रकाश यांच्या कुटुंबीयांना कळताच सर्वजण हळहळले आणि त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वजण हळहळले. घरातून सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू कसा झाला यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा होत असून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चिंताजनक कमेंट्स
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, अचानक मृत्यूची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीनंतर आता हे अधिक दिसून येत आहे. दुसऱ्याने लिहिले की, हृदयविकाराचा झटका खूप सामान्य झाला आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दुसऱ्याने लिहिले की, तरुण वयातच हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.
हेही वाचा>>>
Viral: कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने सोडली माणुसकी! 'असा' मेसेज पाठवला की भडकले नेटकरी, संभाषणाचा स्क्रीनशॉट व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )