Viral: कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने सोडली माणुसकी! 'असा' मेसेज पाठवला की भडकले नेटकरी, संभाषणाचा स्क्रीनशॉट व्हायरल
Viral: अपघातग्रस्त कर्मचारी आणि असंवेदनशील बॉस यांच्यातील संभाषणाचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी प्रचंड संतापले, नेमकं काय घडलं?
Viral: पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाच्या दबावाखाली येऊन एका सीए टॉपरच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. कामाचा प्रचंड ताण असल्याने त्याने मृत्यूला कवटाळलं असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर कर्मचाऱ्यावर कंपनीतील कामाचा प्रचंड ताण हा विषय पुन्हा एकदा अधोरेखित झाला. कॉर्पोरेट संस्थांमध्ये वर्क कल्चरबाबत अनेकदा वाद होतात. अनेक वेळा कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण इतका जबरदस्त होतो की 'माणुसकीची'ही लाज वाटू लागते. अशाच एका प्रकरणाने लोकांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये बॉसने आपल्या कर्मचाऱ्याने कार अपघात झाल्याचे कळवूनही बॉसला दया आली नाही. माणुसकी तर सोडाच, पण बॉसने असे काही मेसेज पाठवले, ते पाहून कोणालाही संताप येईल. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
अपघाताचा फोटो बॉसला पाठवला
इन्स्टाग्रामवर @kirawontmiss या अकाऊंटवरून एक किस्सा शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याला ऑफिसला जाताना अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर कर्मचाऱ्याला उशीर होऊ लागल्यावर त्याने त्याच्या तुटलेल्या कारचा फोटो त्याच्या बॉसला पाठवला. त्यामुळे गंभीर अपघात झाल्याचे समोर येत आहे. मात्र, साहेबांनी दिलेले उत्तर पाहून लोक संतापले. मॅनेजरने चिंता व्यक्त करण्याऐवजी कर्मचाऱ्याला स्वतःबद्दलचे अपडेट्स देत राहण्यास सांगितले.
कंपनी याला माफ करणार नाही..!
मॅनेजरने कर्मचाऱ्याला मेसेज लिहिला आणि म्हणाला - 'तुम्ही ऑफिसला किती वाजता पोहोचता, त्याचे अपडेट मला देत राहा. दिवसभरानंतरही प्रतिसाद न आल्याने मॅनेजरने दुसरा संदेश पाठवला. ज्यात त्यांनी लिहिले - तुम्हाला उशीर का झाला हे समजण्यासारखे आहे, परंतु जर तुम्ही कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यू तर झाला नाही ना? तसं असेल तरंच सुट्टी मिळेल, त्यामुळे ऑफिसला आलात नाही, तर कंपनी तुम्हाला माफ करणार नाही.
what would y’all respond with if your manager says this? pic.twitter.com/bZznlPZrLT
— kira (@kirawontmiss) October 22, 2024
सोशल मीडियावर यूजर्समध्ये नाराजी
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्समध्ये नाराजी पसरली आहे. एका यूजरने लिहिले -"मी अशा बॉससोबत काम करण्याऐवजी नवीन नोकरी शोधेन." एक यूजर म्हणाला, "अशा मॅनजरला शिक्षा मिळायलाच हवी?" दुसरीकडे, एक चांगला अनुभव शेअर करताना, एकाने लिहिले - माझ्या बॉसने मला ऑफिसच्या वेळेत घरी जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून मी माझे वैयक्तिक आयुष्यही जगू शकेन.
हेही वाचा>>>
Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )