(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Bride Video: लग्नापूर्वी नववधू पोहोचली जिममध्ये, सासरच्या मंडळींना सावध राहण्याचा इशारा? नेटकरी आश्चर्यचकित!
Viral Bride Photoshoot Video : काही वधू-वर असे असतात ज्यांना काहीतरी अनोखे करायचे असते. आणि जे सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
Viral Bride Photoshoot Video : प्री वेडिंग शूटचा (Pre Wedding Photoshoot) ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ज्यामध्ये वधू आणि वर लग्नापूर्वी त्यांची संस्मरणीय छायाचित्रे काढतात. या फोटोशूटसाठी कधी रोमँटिक तर कधी ऐतिहासिक लोकेशनची निवड करतात. कधी कधी वेगवेगळ्या थीमवर आधारित फोटो सेशनही होते. कधीकधी लोक त्यांच्या मूडनुसार डेस्टीनेशन निवडतात. लोकेशनला शोभतील त्यानुसार कपडेही परिधान केले जातात. पण काही वधू-वर असे असतात ज्यांना काहीतरी अनोखे करायचे असते. आणि जे सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
वैसे भी शादी से डर लगता है और ऐसा प्री वेडिंग शूट देखकर तो आत्मा कांप गई pic.twitter.com/h4KzmytHMr
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) September 20, 2022
सासरच्या मंडळींना सावध राहण्याचा इशारा
सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या पोशाखात वधू जीममध्ये दिसली तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. वधूला डंबेल्स उचलून व्यायाम करताना पाहून लोकांनी सासरच्या मंडळींना सावध राहण्याचा इशारा दिला. लोकांनी सांगितले की, जिममध्ये घाम गाळून वधू जणू सासरच्यांना सावध राहण्याचा स्पष्ट संदेश देते की, बचके रहना रे बाबा...
नववधूने जिममध्ये केले प्री-वेडिंग शूट
काही लोक ट्रेंडप्रमाणे काहीतरी वेगळे करतात दिसतात. अशाच एका नववधूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जी लग्नाच्या पोशाखामध्ये जिममध्ये पोहोचल्यानंतर व्यायाम करताना दिसली. तिने डंबेल्स उचलून तिची ताकद मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी तिच्या सासरच्या लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला. नववधू तिच्या प्री-वेडिंग शूटसाठी जिममध्ये पोहोचली होती जिथे तिला वधूच्या ड्रेसमध्ये व्यायाम करताना पाहून केवळ जिमचे लोकच नाही तर सोशल मीडियावर नेटकरीही आश्चर्यचकित झाले. पण नंतर हा रुटीन व्यायाम नसून प्री वेडिंग शूटची अनोखी स्टाइल आहे हे समजले. जे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले.
वधूला कसरत करताना पाहून लोकांनी दिला सासरच्या मंडळींना इशारा
लग्नाच्या जोडप्यातील वधूची अनोखी शैली लोकांना आवडली. यासोबतच युजर्सनी यावर विविध मजेशीर कमेंट्स केल्या. वधू- “जर मी तिकडे वजन उचलू शकले, तर पुढे असलेल्या जबाबदाऱ्यांचे ओझे मी उचलू शकेन. त्याच वेळी, एका युजरने लिहिले - संदेश मोठा आणि स्पष्ट आहे. प्रिय सासरे माझ्याशी पंगा घेऊ नका. तर एक म्हणाली - नवऱ्याला एक प्रेमळ आठवण - "हा अडीच किलोचा हात कुणाच्या अंगावर पडला की तो माणूस उठत नाही, उठतो". तर आणखी एक कमेंट अशी आहे की- 'तुमच्या भावी पती आणि सासरच्या लोकांशी माझ्याशी पंगा घेऊ नका'. अशा एकाहून एक मजेशीर कमेंट नेटकऱ्यांकडून येत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Viral Video : अनोखे ब्राइडल फोटोशूट! चक्क खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यात नववधूचा वॉक, नेटकरी झाले थक्क