Viral Video : ड्रायव्हर जोमात, नेटकरी कोमात! विना चाकांचा ट्रक कसा काय धावला? व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
Truck without Front Wheel : एका व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रक ड्रायव्हर चाक नसलेला ट्रक रस्त्यावर भरधाव वेगाने चालवताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
Truck without Front Wheel : सोशल मीडिया (Social Media) मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. यावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालेले पाहायला मिळतात. कधी कॉमेडी तर कधी देशी जुगाड तर, कधी थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. भारतातील देशी जुगाडचे व्हिडीओ तर भन्नाट असतात. सध्या असाच काहीसा एक व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेत आहेत. एका व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रक ड्रायव्हर चाक नसलेला ट्रक रस्त्यावर भरधाव वेगाने चालवताना दिसत आहे. या ट्रकला पुढची दोन्ही चाकच नाहीत. तरीही ड्रायव्हर भाऊ जोमात हा ट्रक चालवताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
ड्रायव्हर जोमात, नेटकरी कोमात
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक ट्रकचालक वेगाने ट्रक घेऊ जात आहे. पण जर तुम्ही पाहिलं तर दिसेल की या ट्रकला पुढची दोन्ही चाकेच नाहीत. तरी ट्रकचालक हा विनाचाकांचा ट्रक वेगाने चालवताना दिसत आहे. पुढची दोन्ही चाके नसतानाही हा ट्रक धावला तरी कसा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चकित झाले आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
View this post on Instagram
विनाचाकांच्या ट्रकचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ पाऊन नेटकरी खूपच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 4.8 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 'fun_zone_91' नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
'ड्रायव्हर ट्रक वळणार कसा?'
नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्यांना याला स्टंट आणि धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. काहींनी लिहिलं आहे की, असा पराक्रम फक्त भारतीय ट्रक ड्रायव्हरच करु शकतात. आणखी एका यूजरने लिहिले आहे, 'पॉवर ऑफ इंडियन ड्रायव्हर'. दुसऱ्या एकाने विचारले आहे की, 'पण ड्रायव्हर ट्रक कसा वळणार?'. याचे उत्तर तर आता ट्रकचालकालाच विचारावे लागेल. मात्र, हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.