(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : मांजराचा जीममध्ये वर्कआउट, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
Trending : मांजरीचा वर्कआउट करतानाचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 9.5 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे.
Trending : आजकाल लोक त्यांच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक आहेत. कारण जीवनशैली इतकी झपाट्याने बदलत आहे की लोकांची शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे आपले आरोग्य खराब न करता बहुतेक लोक वर्कआउट करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुम्हाला एखादी मांजर ही कसरत करताना दिसली तर तुम्ही काय म्हणाल? होय, एक मांजर जीममध्ये वर्कआउट करत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मांजर जिममध्ये जाऊन वर्कआउट करताना दिसत आहे. मांजरीची वर्कआउट करण्याची पद्धत इतकी चांगली आहे की ती मांजर आहे असे वाटणार नाही. मांजरीला जिममध्ये वर्कआउट करताना पाहण्यात खूप मजा येते.
मांजरीचा हा मजेदार व्हिडीओ ‘Buitengebieden’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या ट्विटर पेजचे 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या पेजवर अनेकदा मजेदार व्हिडीओ पाहिले जातात.
Work out.. 😅 pic.twitter.com/WqFsitRHQj
— Buitengebieden (@buitengebieden) June 15, 2022
लाखो लोकांनी पाहिला व्हिडीओ
मांजरीचा वर्कआउट करतानाचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 9.5 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओला जवळपास 79.5 हजार वेळा रिट्विट करण्यात आले आहे. तर 46 हजार 600 नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक देखील केले आहे. सोशल मीडीयावर मांरीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. मांजरीचे हे वर्कआउट पाहून नेटकऱ्यांना हसू आवता येत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण तो शेअर करत आहेत.
महत्वाच्या बातम्या