Women Not Allowed : 'या' ठिकाणी महिलांना प्रवेश नाही; इच्छा असूनही जाता येत नाही, प्रवेशासाठी संघर्ष कायम
Women Not Allowed Here : आजही जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे. महिलांना इच्छा असूनही येथे जाता येत नाही. येथे महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. भारतातही अशी काही ठिकाणं आहेत.
Women Not Allowed Here : आज महिला (Women) प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरताना दिसत आहेत. जागतिक पातळीवरही महिलांचा आदर केला जातो. विविध क्षेत्रात महिलांनी विशेष प्रगती केली आहे. पण आजही जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे. महिलांना इच्छा असूनही येथे जाता येत नाही. येथे महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. भारतातही अशी काही ठिकाणं आहेत.
जाणून घ्या जगातील अशा ठिकाणांबद्दल जिथे महिलांना प्रवेशासाठी परवानगी नाही.
कार्तिकेय मंदिर, भारत
भारतातील राजस्थानमधील पुष्कर शहरातही असं एक मंदिर आहे, जिथे महिलांना प्रवेश बंदी आहे. पुष्कर शहरातील कार्तिकेय मंदिरामध्ये महिलांना प्रवेशासाठी परवानगी नाही. हे मंदिर भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. या मंदिरात भगवान कार्तिकेय यांचं ब्रह्मचारी रुप दाखवण्यात आलं आहे. या मंदिरात चुकून कोणत्या महिलेने प्रवेश केल्यास त्या महिलेला भगवान कार्तिकेय यांचा शाप लागतो, असं सांगितलं जातं. या भीतीपोटी एकही महिला या मंदिरात जात नाही.
सबरीमाला मंदिर, केरळ
भारतातील केरळमधील सबरीमाला मंदिरातही महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. यावरही वादही सुरु आहे. महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा अनेकवेळा चर्चेत आला, मात्र आजतागायत याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सबरीमाली मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशाला मनाई आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मंदिरातील देवता ब्रह्मचारी आहे.
इराणी स्पोर्ट्स स्टेडियम
इराणी स्पोर्ट्स स्टेडियममध्ये महिलांना इच्छा असूनही जाता येत नाही. इराणमध्ये महिलांना स्पोर्ट्स स्टेडियममध्ये जाण्यास बंदी आहे. 1979 च्या क्रांतीनंतर महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली. स्त्रिया पुरुष शॉट्स खेळताना पाहतील आणि हे योग्य नाही, असा तत्कालीन इराण सरकारचा समज होता. अनेक वेळा पुरुष खेळादरम्यान असभ्य भाषाही वापरतात, जर महिला तिथे उपस्थित असतील तर अशी भाषा वापरणं योग्य ठरणार नाही, असाही इराण सरकारचा समज होता. त्यामुळे स्टेडियममध्ये महिलांना प्रवेश नाही.
माउंट एथोस, ग्रीस
ग्रीसचा माऊंट एथोस खूप सुंदर आहे. या ठिकाणी 1000 वर्षांपूर्वी येथे महिलांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी होती. येथे महिलांना तर प्रवेश नाही, याशिवाय कोणत्याही मादा प्राणीलाही प्रवेश बंदी आहे. माऊंट एथोस हे रुढीवादी (Orthodox) ख्रिश्चन भिक्षूंचे 1,000 वर्षांहून जुनं धार्मिक केंद्र आहे. हे युरोपमधील एकमेव युनेस्को जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही कारणांसाठी ओळखलं जातं. इथे दरवर्षी फक्त 100 रुढीवादी आणि 100 गैर-रुढीवादी पुरुषांना प्रवेश दिला जातो.
ओकिनोशिमा बेट, जपान
ओकिनोशिमा हे जपानचं पवित्र बेट आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसामध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. शिंटो परंपरेमुळे महिला येथे येऊ शकत नाहीत. शिंटो परंपरा ही बौद्ध धर्म, कन्फ्युशियनवाद, ताओवाद आणि चीन यांची मिळून तयार झाली आहे. यामध्ये ब्रह्मचर्येचं पालन केलं जातं.
बर्निंग ट्री क्लब, यूएस
अमेरिकेत बर्निंग ट्री कंट्री नावाचा एक अनोखा गोल्फ क्लब आहे. या गोल्फ क्लबमध्ये फक्त पुरुषांनाच येण्याची परवानगी आहे. हा क्लब खूप प्रसिद्ध असल्याने येथे राष्ट्राध्यक्षांपासून न्यायाधीशांपर्यंत दिग्गज गोल्फ खेळण्यासाठी येत असल्याने महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :