एक्स्प्लोर

Trash on Moon : चंद्रावर 200 टन कचरा! टॉवेल, ब्रश, मल-मूत्र... चंद्रावर 'या' गोष्टी सोडून आले वैज्ञानिक; आतापर्यंत 12 जणांनी ठेवलंय चंद्रावर पाऊल

Moon Mission : मानवाने चंद्रमोहिमेद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर तेथेही कचरा मागे सोडला आहे. (How much trash is on the moon)

Trash on The Moon : मानव गेल्या अनेक वर्षांपासून अवकाश संशोधन करत आहे. पृथ्वीवरुन चंद्रावर पोहोचला मात्र, आपल्यासोबत कचराही तिथे घेऊन गेला आहे. मानवाने आतापर्यंत केलेल्या चंद्रमोहिमाद्वारे पृथ्वीवरील कचरा चंद्रावर सोडला आहे. या कचऱ्यामध्ये घन कचरा, मशीन, उपग्रहांचे अवशेष, मानवाचं मल-मूत्र, भाला, चिमटे, टॉवेल, ब्रश या गोष्टींचाही समावेश आहे. 

मानवाने चंद्रावर नेला 200 टन कचरा

थोडक्यात काय तर मानव अगदी अंतराळात गेला तरी तिथेही कचरा मात्र, त्याची पाठ सोडत नाही. द गार्डियानच्या रिपोर्टनुसार, मानवाने आतापर्यंत चंद्रावर सुमारे 200 टन कचरा नेला आहे. यामध्ये मानवी मल-मूत्र आणि उलटीच्या पिशव्याही आहेत. अंतराळ मोहिमा संपल्यानंतर त्यामधील विविध उपकरणे, उपग्रह हा सर्व घन कचरा ठरतो.

चंद्रावरील कचरा कोणत्या प्रकारचा?

  • अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अपोलो 11 मिशनद्वारे मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं. हे अपोलो यान चंद्रावर जिथे लँड झालं, त्याच्या बाजूला काही वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या पाहायला मिळाल्या.
  • चंद्रावरील 200 टन कचऱ्यामध्ये अपोलो मिशनचे 5 सॅटर्न-व्ही रॉकेटचे अवशेष मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर इतर देशांच्या अंतराळयानांच्या अवशेष या कचऱ्यामध्ये आहेत.
  • याशिवाय चंद्रावर रोबोटिक लँडर्स आणि रोव्हर्सचा ढिगाराही मोठ्या प्रमाणात आहे, ज्याचा आता काहीच उपयोग नाही. त्यांच्या बॅटरी संपल्या आहेत किंवा काहींचा हार्डवेअर खराब झाला आहे. 
  • लुना 9 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे पहिले अंतराळयान आहे. त्याचे अवशेष चंद्राच्या पश्चिम ध्रुवावर आहे.
  • क्रॅश झालेल्या आणि तुटलेल्या अंतराळयानाव्यतिरिक्त, अनेक वैयक्तिक सामान देखील चंद्रावर आहे. अंतराळवीरांनी चंद्रमोहिमेदरम्यान सोडलेल्या वस्तूही तेथील कचऱ्यात आहेत.
  • यामध्ये मानवी मलमूत्र आणि उलटीच्या 96 पिशव्यांचाही समावेश आहे. याशिवाय, दोन गोल्फ बॉल देखील आहेत. अपोलो-14 मोहिमेदरम्यान अंतराळवीर ॲलन शेपर्ड यांनी हे दोन गोल्फ बॉल मारले होते. 
  • अंतराळवीर एडगर मिशेल यांनी चंद्रावर फेकलेल्या धातूच्या रॉडही तिथे आहे, याल भाला म्हणतात.
  • अपोलो-15 वर चंद्रावर गेलेले अंतराळवीर जेम्स इर्विन यांनी डॅशबोर्डवर बायबल तिथे सोडलं, तेही अजून चंद्रावर आहे. 
  • अपोलो-16 मोहिमेतील अंतराळवीर चार्ल्स ड्यूक यांचा त्यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटोही चंद्रावर आहे. हा फोटो त्यांनी 1972 मध्ये तिथे ठेवला होता. 1972 मध्ये ते चंद्रावर पाऊल ठेवणारे 10वे व्यक्ती आणि सर्वात तरुण शास्त्रज्ञ ठरले.

आतापर्यंत चंद्रावर पोहोचलेले 12 व्यक्ती

1. 1969 मध्ये अपोलो-11 मोहिमेअंतर्गत अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोहोचले.

2. नील आर्मस्ट्राँगसोबत चंद्रावर पोहोचणारा बझ आल्ड्रिन हा दुसरा व्यक्ती होता.

3. अमेरिकेने 1969 मध्येच अपोलो-12 मिशन पाठवले होते. त्यात पीट कॉनरॅड आले होते.

4. अपोलो-12 मिशनमध्ये ॲलन बीन देखील कॉनरॅडसोबत होते. 7. डेव्हिड अपोलो-15 मिशन अंतर्गत स्कॉडमध्ये गेला होता.

5. ॲलन शेपर्ड 1971 मध्ये अपोलो-14 मिशन अंतर्गत गेले होते.

6. एडगर मिशेल देखील शेपर्डसोबत गेला.

8. जेम्स इर्विन देखील अपोलो-15 मोहिमेवर गेला होता.

9. अपोलो-16 मोहिमेत जॉन यंग चंद्रावर पोहोचला.

10. चार्ल्स ड्यूक देखील अपोलो-16 मिशनमध्ये यंगसोबत होते.

11. अपोलो-17 मोहिमेत यूजीन सर्नन पोहोचले.

12. त्याच्यासोबत हॅरिसन स्मिथ देखील होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Viral Video : एलियनप्रमाणे दिसणाऱ्या बाळाचा जन्म, सोशल मीडियावर चर्चांना उधाण; तुम्ही व्हिडीओ पाहिला का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget