Viral Video : एलियनप्रमाणे दिसणाऱ्या बाळाचा जन्म, सोशल मीडियावर चर्चांना उधाण; तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
Genetic Disorder : व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बाळाची त्वचा पूर्णत: पांढऱ्या रंगाची दिसत आहे. यासोबतच बाळाच्या त्वचेवर अनेक भेगाही दिसून येत आहेत.
मुंबई : आई होणं हा प्रत्येक महिलेचा नवा जन्म मानला जातो. प्रत्येक आईसाठी तिचं मूल खास असतं. आई बाळाला पोटात नऊ महिने सांभाळते. त्यानंतरही ती त्याची खूप काळजी घेते. प्रत्येक आईसाठी तिचं मूल जणू अमूल्य भेट असते, मग ते बाळ कसंही असो. बाळाला प्रत्येक दु:ख आणि संकटापासून दूर ठेवण्यासाठी आई सर्वतोपरी कष्ट करते. त्यातच मूल आजारी पडलं तर, मात्र तिला सर्वाधिक त्रास होतो. अशातच काही मूलं दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असतात. यातील काही आजार तर असे असतात, ज्यावर डॉक्टरही काही उपाय करू शकत नाहीत.
एलियनप्रमाणे दिसणारं बाळ
अशीच एक घटना समोर आली आहे. एका बाळाचा जन्म झाला तो दुर्मिळ आजारासह. हे बाळ जन्मत:च दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या बाळाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बाळाची त्वचा पूर्णत: पांढऱ्या रंगाची दिसत आहे. यासोबतच बाळाच्या त्वचेवर अनेक भेगाही दिसून येत आहेत. या बाळाला पाहून डॉक्टर आणि आईलाही धक्का बसला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या बाळाचं संपूर्ण शरीराची त्वचा पांढऱ्या रंगाची आहे. मात्र, तोंड आणि डोळे लाल रंगाचे आहेत. त्यांच्या संपूर्ण शरीरावर भेगा पडल्याचं दिसून येत आहे. या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोशल मीडियावर या बाळाची तुलना एलियनशी केली जात आहे. काही तर याला एलियन असल्याचंच म्हणत आहेत.
दुर्मिळ आजाराने ग्रस्त
हे मानवाचं मूल असून ते दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळेच ते इतर बाळांच्या तुलनेने दिसायला वेगळं आहे. हे बाळ दुर्मिळ अनुवंशिक आजारासह जन्माला आलं आहे. या बाळाला हार्लेक्विन इचथिओसिस (Harlequin Ichthyosis) नावाचा अनुवंशिक आजार आहे. या आजाराचा परिणाम त्वचेवर दिसून येतो.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
View this post on Instagram
'या' आजारावर उपचार नाही
हार्लेक्विन इचथिओसिस (Harlequin Ichthyosis) या आजाराने ग्रस्त असलेली मूल प्रीमॅच्युअर (Premature) म्हणजेच नऊ महिन्याआधी जन्मलेली दिसतात. त्यांच्या शरीरावरील त्वचा जाडसर आणि कडक असते, ज्यामध्ये भेगा दिसतात. सर्वात धक्कादायक म्हणजे या आजारावर कोणताही इलाज नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलालाही हाच अनुवांशिक आजार आहे, त्यामुळे हे बाळ असं दिसत आहे.