(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sun: चीनने बनवला कृत्रिम सूर्य; खऱ्या सूर्याच्या तुलनेत किती शक्तिशाली? जाणून घ्या
Artificial Sun: चीनने अनेक मोठ्या देशांना मागे टाकून कृत्रिम सूर्य तयार केला आहे. चीनचा हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
Artificial Sun of China : भारताने शनिवारी (2 सप्टेंबर) आपली पहिली सूर्य मोहीम प्रक्षेपित केली. भारतापूर्वी अनेक देशांनी आपली सूर्य मोहीम (Sun Mission) पार पडली आहे, ज्यात त्यांना यशही मिळालं आहे. पण चीनने (China) कोणतीही मोहीम सूर्यावर न पाठवता चक्क डुप्लिकेट सूर्याचीच निर्मिती केली आहे, जो खऱ्या सूर्यापेक्षा कितीतरी पट जास्त ऊर्जा देतो.
खऱ्या सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी चीनचा सूर्य
चीनने हा सूर्य आण्विक संशोधनातून (Nuclear Research) निर्माण केला आहे. हा प्रकल्प 2006 मध्ये सुरु झाला. चीनने या कृत्रिम सूर्याला HL-2M असं नाव दिलं आहे. हा सूर्य चीनच्या नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशनसह साऊथवेस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी बनवला आहे. प्रतिकूल हवामानातही सौरऊर्जा टिकवून ठेवण्याचा या चिनी प्रकल्पाचा उद्देश आहे. या कृत्रिम सूर्याचा प्रकाश खऱ्या सूर्यासारखा तेजस्वी असेल. न्यूक्लियर फ्युजनच्या मदतीने तो तयार करण्यात आले आहे, ज्याला या प्रणालीद्वारेच नियंत्रित केलं जाणार आहे.
खऱ्या सूर्यापेक्षा जास्त उष्ण चीनचा सूर्य
कृत्रिम सूर्य बनवून चीनने विज्ञानाच्या बाबतीत अमेरिका, जपान, रशिया अशा अनेक देशांना मागे टाकलं आहे. या सूर्याला बनवताना शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र वापरण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. चीनचा हा कृत्रिम सूर्य 15 कोटी अंश सेल्सिअस तापमान गाठू शकतो. चीनचा कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा दहापट जास्त गरम असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. जर आपण वास्तविक सूर्याच्या तापमानाबद्दल बोललो तर त्याचं तापमान सुमारे 15 कोटी अंश सेल्सिअस आहे.
कृत्रिम सूर्य बनवण्यासाठी चीनला किती खर्च आला?
चीनच्या सिचुआन प्रांतात असलेल्या अणुभट्टीला अनेकदा कृत्रिम सूर्य म्हटलं जातं. ती खऱ्या सूर्याप्रमाणेच उष्णता आणि वीज निर्माण करु शकते. चीनच्या दैनंदिन ऊर्जेच्या गरजा भागवण्याबरोबरच चीनच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अणुऊर्जेचा विकास उपयुक्त ठरेल, असं अहवालातून स्पष्ट झालं आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 22.5 अब्ज डॉलर्स आहे.
भारताची आदित्य L1 सूर्यमोहीम लाँच
भारताच्या आदित्य L1 (Aditya L1) या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचं यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे.
हेही वाचा: