(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shocking Viral Video: कारचालकाची एक चूक पडली महागात, बाईकस्वारांचा घेतला जीव, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Shocking Viral Video: हा व्हिडीओ व्हायरल होत असून कारचा दरवाजा उघडताना प्रत्येक ड्रायव्हरने काळजी घ्यावी. तुमची एक चूक दुसऱ्यांचा जीव घेऊ शकते
Shocking Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून सर्वांनी धडा घ्यावा. रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार चालकाच्या चुकीमुळे दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. काही वेळा चारचाकी वाहनचालकांकडून चुका होतात. त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ पाहावा आणि काळजी घ्यावी.
धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमध्ये दोन तरुण दुचाकीवरून येत असल्याचे दिसत आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारचा दरवाजा कारचालक उघडतो. त्यामुळे दुचाकीस्वार टक्कर टाळण्यासाठी रस्त्याच्या दिशेने जातो. आणि अचानक समोरून येत असलेल्या ट्रकची त्यांना धडक बसली. व्हिडीओचे दृश्य तुमचे लक्ष विचलित करू शकतात, त्यामुळे कमजोर ह्रदय असलेल्यांनी व्हिडीओपासून दूर रहा. असा सल्ला देण्यात येत आहे.
" Please be aware when you are opening the doors of your vehicle and avoid fatal mishaps " @DgpKarnataka @CPBlr @AddlCPTraffic @jointcptraffic @BlrCityPolice @blrcitytraffic @acpcentraltrf @acpeasttraffic @acpwfieldtrf @acpsetraffic pic.twitter.com/WPrL0POeLM
— Kala Krishnaswamy, IPS DCP Traffic East (@DCPTrEastBCP) September 28, 2022
कार चालकाचा निष्काळजीपणा
कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वार ट्रकवर आदळला. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी आणि पोलिस उपायुक्त (पूर्व बंगळुरू) कला कृष्णस्वामी यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, कृपया तुमच्या वाहनाचा दरवाजा उघडताना काळजी घ्या आणि अपघात टाळा.
आयपीएस अधिकाऱ्यांनी केला पोस्ट
हा व्हिडीओ तसा जुना आहे. आयपीएस अधिकारी कृष्णस्वामी यांनी रस्ते अपघाताच्या घटना पाहता सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही घटना कर्नाटकातील आहे. कारचा दरवाजा उघडताना प्रत्येक ड्रायव्हरने काळजी घ्यावी. तुमची एक चूक दुसऱ्यांचा जीव घेऊ शकते. तसेच एका कार चालकाच्या छोट्याशा चुकीने बाईकस्वाराला मृत्यूच्या दाढेत कसे ढकलले ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले. रस्त्याचे नियम न पाळणारे असे बेफिकीर लोक स्वतःबरोबरच इतरांच्या जीवालाही धोका देतात. अशा लोकांना निष्काळजीपणाची जाणीव करून देण्यासाठी बेंगळुरू पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. अपघाताच्या या व्हिडीओने तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल.
महत्वाच्या बातम्या :
- Trending Video : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण गाईला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा हा व्हायरल व्हिडीओ
- Viral Video : स्ट्रीट फूड आवडीनं खाताय? पाहा 'हा' धक्कादायक व्हिडीओ, मिठाईवाला चक्क झाऱ्यानं खाजवतोय पाठ!