Relationship: महिलेच्या 'घटस्फोट पार्टीची' चर्चा! केक कापला, लग्नाचा शालू फाडला, अन् असं काही केलं की.. तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
Divorce Party: मुलींच्या चेहऱ्यावरील लग्न झाल्याचा आनंद सगळ्यांनीच पाहिला असेल, पण तुम्ही त्यांना घटस्फोट साजरा करताना कधी पाहिलंय का? या संबंधित एक व्हिडीओ होतोय व्हायरल.. जाणून घ्या..
Divorce Party: एखाद्या तरुणीचं जेव्हा लग्न होतं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद निराळाच असतो. गालावर लाजेची लाल लाली पाहायला मिळते, आपल्या आय़ुष्याची नवी सुरूवात म्हणून ती खूप उत्साही असते. मुलींच्या चेहऱ्यावरील लग्न झाल्याचा आनंद सगळ्यांनीच पाहिला असेल, पण तुम्ही त्यांना घटस्फोट साजरा करताना कधी पाहिलंय का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला महिलेल्या एका अशा घटस्फोट पार्टीबद्दल सांगणार आहोत, जिच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहाच..
महिलेने घटस्फोट झाल्याचा आनंद साजरा केला
एकीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सर्वत्र सनई-चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला घटस्फोटाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. घटस्फोटानंतर महिला केक कापताना आणि तिच्या लग्नाचा फोटो फाडताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधले आहे.
केकवर हॅपी घटस्फोट लिहलंय!
एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घटस्फोटाचा आनंद साजरा करणाऱ्या महिलेनेही केक कापला. केटवर हॅपी घटस्फोट लिहिले आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर स्त्रीच्या चेहऱ्यावर लग्नाच्या वेळी दिसणारा आनंद कधीच हिरावून बसतो. मात्र या महिलेने अगदी विरुद्ध काम केलंय. ज्याबद्दल सोशल मीडियावर काही जणांकडून कौतुक होतंय. तर काही जणांकडून तिला ट्रोल केलं जातंय.
लग्नाचा फोटो फाडला, लग्नाचा शालू कापला..!
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिचा घटस्फोट झाल्याचा आनंद साजरा करत आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, महिलेने आधी हॅप्पी डिव्होर्स केक कापला, नंतर कात्रीने लग्नाचा ड्रेस कापला आणि नंतर लग्नाचा फोटो फाडला. हे सर्व करताना ती खूप आनंदी दिसत होती. महिलेने कापलेला ड्रेस हा तिचा लग्नाचा पोशाख आहे. 2020 मध्ये महिलेचे लग्न झाले. त्यांचे नाते चांगले नव्हते आणि 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अवघ्या 4 वर्षातच दोघेही वेगळे झाले. पार्टीच्या सेलिब्रेशनमध्ये महिलेचा आनंद पाहून नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत.
Bruh
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 15, 2024
pic.twitter.com/66POBcB7jD
लोक करतायत भन्नाट कमेंट
व्हायरल व्हिडिओवर यूजर्स अतिशय विचित्र आणि विनोदी कमेंट करत आहेत. काहींनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले तर काहींनी टीकाही केली. आपला देश एवढ्या वेगाने पुढे जात आहे आणि एवढ्या वेगाने बदल घडत आहेत, याची आपण कल्पनाही केली नव्हती. दुसऱ्याने लिहिले- हे तेच लोक आहेत जे व्हिडीओ शूट करतात.. आणि म्हणतात, मी माझ्या आजीच्या अंत्यसंस्कारात माझा मेकअप कसा केला होता. तिसऱ्याने लिहिले- आपला देश प्रगती करत आहे. एकाने लिहिले- जर तुम्हाला त्या नात्यातून खरोखरच वेदना झाल्या असतील तर तुम्ही तुमचा आनंद असा दाखवू शकत नाही, तुम्हाला रिलॅक्स केलं पाहिजे, पार्टी नाही. अशाच अनेक कमेंट्स आल्या आहेत.
हेही वाचा>>>
Open Marriage चा ट्रेंड आजकाल वाढतोय! नेमका काय प्रकार आहे? फायदे अन् तोटे जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )