एक्स्प्लोर

Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले! तुम्हाला मिळू शकते एन्ट्री, असं करा घरबसल्या बुकिंग

राष्ट्रपती भवनाचे (Rashtrapati Bhavan) दरवाजे सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही काय पाहू शकता? तसेच राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्यासाठी कशा प्रकारे बुकिंग करावे लागते? याबाबत जाणून घेऊयात...

Rashtrapati Bhavan: भारताचे प्रथम नागरिक असणारे राष्ट्रपती यांचे निवासस्थान म्हणजे राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan). राष्ट्रपती भवन हे नवी दिल्ली (New Delhi) येथे आहे. राष्ट्रपती भवन हे अतिशय सुंदर आणि भव्य आहे. राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्याची अनेकांची इच्छा असते. आता 1 डिसेंबरपासून राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी आठवड्यातून 5 दिवस राष्ट्रपती भवन खुले असणार आहे. आठवड्यातील बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी  राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे. राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही काय पाहू शकता? तसेच राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्यासाठी कशा प्रकारे बुकिंग करावे लागते? याबाबत जाणून घेऊयात...

राष्ट्रपती भवनामध्ये काय पाहावे? 
दरबार हॉल- राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, खेलरत्न पुरस्कार हे पुरस्कार विविध व्यक्तींना प्रदान केले जातात. या पुरस्कारांच्या कार्यक्रमांचे आयोजन दरबार हॉल या सभागृहात केले जाते. या हॉलमध्ये 1500 वर्षे जुनी भगवान बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दरबार हॉलच्या अगदी समोर एक गेट देखील आहे. हे फक्त 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट सारख्या काही खास प्रसंगी उघडले जाते. या हॉलमध्ये एकावेळी 400 हून अधिक लोकांची बैठक व्यवस्था केली जाऊ शकते. 

अशोका हॉल- राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिन केले जाते. 

बँक्वेट हॉल- बँक्वेट हॉलमध्ये 100 हून अधिक लोकांची बैठक व्यवस्था केली जाऊ शकते. राष्ट्रपती इतर देशांतील प्रतिनिधींसोबत या सभागृहात जेवण करतात. या सभागृहाच्या दोन्ही भिंतींवर माजी राष्ट्रपतींची कॅनव्हासवर बनवलेली पोर्ट्रेट चित्रे आहेत. या चित्रांवर तीन प्रकारचे दिवे देखील आहेत. बँक्वेट हॉलच्या खिडकीतूनही तुम्ही मुघल गार्डन पाहू शकता.

मार्बल म्युझिक हॉल
राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तूंची सजावट या सभागृहात करण्यात आली आहे.  मार्बल म्युझियम हॉल 2016 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भेट देण्यासाठी आणि पाहण्यासाठी खुला केला होता.  नॉर्थ ड्रॉइंग रुम, लाँग ड्रॉइंग रुम, भगवान बुद्धांची मूर्ती इत्यादी गोष्टीपण तुम्ही बघू शकता. 

कसे करावे बुकिंग? 

तुम्हालाही राष्ट्रपती भवनाला भेट द्यायची असेल, तर त्यासाठी आधी तुम्हाला ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. तुम्ही राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता. राष्ट्रपती भवन बुधवार ते रविवार आठवड्यातील पाच दिवस सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे. तुमच्याकडे पाचही दिवस सकाळी 10 आणि 11, दुपारी 12, संध्याकाळी 2 आणि 3 वाजता प्रत्येकी एक तासाच्या स्लॉटचा पर्याय आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि स्लॉटच्या उपलब्धतेनुसार दिवस आणि वेळ निवडून या भव्य इमारतीला भेट देऊ शकता.

23 हजार मजुरांनी काम केले
1913 मध्ये  राष्ट्रपती भवन बांधण्याचे काम सुरु झाले होते. 17 वर्षात राष्ट्रपती भवन बांधकाम पूर्ण झाले. राष्ट्रपती भवन तयार करण्यासाठी सुमारे 23,000 मजुरांनी काम केले, त्यापैकी 6,000 मजूर केवळ दगडांवरील कोरीव काम करणारे होते. वास्तुविशारद लुटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची रचना केली होती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Rare Blue Diamond Auction : जगातील दुर्मिळ निळ्या रंगाच्या हिऱ्याचा होणार लिलाव, 15 डॉलर मिलीयन पर्यंत विक्री होण्याची अपेक्षा

 

महत्त्वाच्या बातम्या

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget