Rare Blue Diamond Auction : जगातील दुर्मिळ निळ्या रंगाच्या हिऱ्याचा होणार लिलाव, 15 डॉलर मिलीयन पर्यंत विक्री होण्याची अपेक्षा
Rare Blue Diamond Auction : जगातील सर्वात दुर्मिळ निळ्या रंगाच्या हिऱ्याचा लिलाव होणार आहे, जाणून घ्या
Rare Blue Diamond Auction : हिरा (Diamond) ही जगातील सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक आहे. पारदर्शक व्यतिरिक्त हे हिरे अनेक रंगांचे आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी आहे. जगातील सर्वात दुर्मिळ निळ्या रंगाच्या हिऱ्याचा लिलाव होणार आहे, (Rare Blue Diamond Auction) क्रिस्टीच्या दागिन्यांच्या लिलावात एक दुर्मिळ निळा हिरा $15 मिलीयन पर्यंत विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.
A rare blue diamond could fetch up to $15 million in Christie's final live jewelry auction of the year pic.twitter.com/4f9tMu4hB8
— Reuters (@Reuters) December 6, 2022
31.62 कॅरेटचा हिरा भव्य दागिन्यांच्या विक्रीचा भाग आहे, विक्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कार्टियरने बसवलेला डायमंड पाम ट्री ब्रोच आहे, ज्याची किमान 5 लाख डॉलर्समध्ये विक्री होण्याची अपेक्षा आहे.
निळ्या रंगाच्या हिऱ्याचा लिलाव
एप्रिलमध्ये आणखी एका जगातील सर्वात मोठ्या निळ्या रंगाच्या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला होता, ज्याची किंमत 57.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 4.4 अब्ज रुपये होती. फाईन आर्ट्स कंपनी सोथेबीजने हाँगकाँगमध्ये या हिऱ्याचा लिलाव केला होता. या हिऱ्याला 'द डी बियर्स कलिनन ब्लू' असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी चार खरेदीदारांमधील बोलीयुद्ध आठ मिनिटे चालले. त्याचवेळी एका खरेदीदाराने कॉल केला आणि हिऱ्यासाठी $48 दशलक्षची सर्वोच्च बोली लावली होती. हा दुर्मिळ हिरा 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कुलीनन खाणीत सापडला होता. रंगीत हिर्यांमध्ये याचे सर्वोच्च स्थान होते.
याआधीही दुर्मिळ हिरे लिलावासाठी ठेवले
यापूर्वी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील क्रिस्टीच्या लिलावगृहात एक दुर्मिळ निळ्या हिऱ्याची अंगठी लिलावासाठी ठेवण्यात आली होती. त्यातील आयताकृती हिरा 7.03 कॅरेटचा होता. हा हिरा अतिशय सुंदर होता. त्याची 10 ते 14 दशलक्ष डॉलर्स (जास्तीत जास्त 100 कोटी रुपये) विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. क्रिस्टीजच्या म्हणण्यानुसार, याआधीही दुर्मिळ हिरे लिलावासाठी ठेवण्यात आले होते, परंतु ते कधीही त्यांच्या अंदाजे किंमतीपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे आता लिलावासाठी ठेवण्यात आलेला या हिऱ्याची कितीने विक्री होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या