Leopard Walks Into House Viral Video: वो स्त्री है कुछ भी कर सकती है! घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेने दोरीने पाय बांधून चादरीत गुंडाळलं, VIDEO व्हायरल
Leopard Walks Into House Viral Video : बिबट्याला पाहून स्वतःचा जीव वाचवणारे, नाव ऐकून पळ काढणाऱ्या जगात आज एका महिलेच्या धाडसाने सगळेच थक्क झाले.

Leopard Walks Into House Viral Video: जंगलातील प्राणी मानवी वस्तीत दिसण्याच्या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. बिबट्या, वाघ, सिंह हे प्राणी अनेकदा गावांमध्ये किंवा शहरी भागात शिरतात आणि अनेक वेळा माणसांवर हल्लेही करतात. पण अशा प्राण्यांशी सामना करणे वाटते तितके सोपे नसते. मात्र, अशाच एका घटनेत एका महिलेने दाखवलेले धाडस सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे एका घरात अचानक बिबट्या घुसला(Leopard Walks Into House Viral Video). सर्वत्र एकच गोंधळ उडाला. घरातील सदस्यांनी घाबरून पळ काढला. परंतु याच घरात राहणाऱ्या एका महिलेने धाडस दाखवत बिबट्याला चक्क दोरीने बांधून ठेवले आणि वन विभागाला माहिती दिली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.(Leopard Walks Into House Viral Video)
View this post on Instagram
Leopard Walks Into House Viral Video: नेमकं काय घडलं?
ही घटना उदयपूरमधील आहे, जिथे बिबट्याने एका घरात शिरकाव केला. बिबट्याला पाहून बहुतेक लोक घाबरून पळाले. पण त्या घरातील महिलेने घाबरण्याऐवजी, धैर्याने आणि प्रसंगावधान राखून हातात दोरी घेतली आणि संधी साधून बिबट्याच्या पायाला बांधून ठेवले. यानंतर तिने तात्काळ वन विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले.
Leopard Walks Into House Viral Video: व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून अनेकांनी या महिलेला "वाघीण" असे संबोधले आहे. काहीजणांनी तर विनोदी भाषेत प्रतिक्रिया देताना म्हटले, "बिबट्याचं हे हाल आहे, तर नवऱ्याचं काय होत असेल?" या घटनेमुळे एका सामान्य महिलेचे असामान्य धैर्य समोर आले आहे. जंगलातील प्राण्यांचा सामना करताना केवळ भीती नाही, तर प्रसंगावधान आणि शौर्यही आवश्यक आहे, हे तिने दाखवून दिले आहे. तिच्या या कृतीमुळे मोठा अनर्थ टळला आणि परिसरात भीतीचं वातावरण असतानाही ती शांत आणि संयमित राहिली. तिचं हे धाडस समाजासाठी एक प्रेरणा देणारं ठरत आहे.
Funny Comment on viral video: या व्हायरल व्हिडीओखाली आलेल्या मजेदार कमेंट
- वो औरत है वो कुछ भी कर सकती है
- काय लेपर्ड बनगा रे तू
- वाईफ से पंगा नहीं
-औरत का चक्कर मौत से टक्कर
- जर बिबट्याचे हे हाल आहेत तर पतीचे काय हाल असतील, अशा अनेक मजेदार कमेंट या व्हायरल व्हिडीओच्या खाली आलेल्या आहेत.





















