Optical Illusion: चित्रकाराने केली मोठी चूक, 10 सेकंदात उत्तर सांगाल तर तुम्हाला कडक सॅल्यूट; तर मग आव्हान स्वीकारा
Brain Teaser: ऑप्टिकल इल्युजन टेस्टमध्ये तुम्हाला कलाकाराने केलेली एक मोठी चूक 10 सेकंदात शोधून सांगायची आहे. छायाचित्रात चार मित्र बर्फाळ टेकडीवर स्कीइंगचा आनंद घेताना दिसत आहेत.
Optical Illusion Challenge : ब्रेन टीझर किंवा ऑप्टिकल इल्युजन हे असं फोटो कोडे असते की त्यामध्ये मेंदूला काहीसा ताण द्यावा लागतो. या प्रकारचे कोडे सोडवण्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा होऊ शकतो, डोकं कधी कधी भिरभिरून जाऊ शकतं, म्हणजेच डोक्याला शॉट लागू शकतो. अशा काही चित्रांमधील चूका शोधणे किंवा त्यामध्ये काय कमी आहे हे शोधणे आव्हानात्मक असतं. जे लोक पाहताच क्षणी त्यातील चुका शोधू शकतात त्यांचा आयक्यू लेव्हल म्हणजे बुद्धीमत्ता ही इतरांच्या तुलनेत अधिक चांगली असल्याचं मानलं जातं.
सोशल मीडियावर तुम्हाला अनेक ब्रेनटीझर्स सापडतील. यापैकी काही तुमची तार्किक शक्ती तपासतात, तर बहुतेक चित्रे तुमची तीक्ष्ण दृष्टी तपासण्याचा दावा करतात. आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या मनोरंजक ब्रेनटीझरमध्ये तुम्हाला कलाकाराची एक चूक 10 सेकंदात शोधायची आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चार मित्र बर्फाळ टेकडीवर स्कीइंगचा आनंद लुटताना दिसत आहेत. पण यात एक मोठी चूक आहे, जी तुम्हाला पकडावी लागेल.
या मेंदूला आव्हान देणारे फोटो कोडे पहा. चित्रात बर्फाचा डोंगर दिसत आहे. त्याच वेळी चार लोक स्नोसूटमध्ये स्कीइंग करताना दिसतात. पहिल्या दृष्टीक्षेपात चित्र अगदी सामान्य दिसते. परंतु जेव्हा आपण त्याचा बारकाईने अभ्यास केला तेव्हा आपल्याला लक्षात येईल की कलाकाराने त्यात खूप मोठी चूक केली आहे.
आता तुमचा फोन घ्या आणि टायमर सेट करा. तुम्हाला जर यातील चूक ही 10 सेकंदात शोधता आली तर तुम्ही हुशार आहात असं समजा. आणि जर तुम्हाला ही चूक शोधता आली नाही तर खालील चित्रामध्ये पाहा. त्यामध्ये नेमकी काय चूक आहे हे सांगितलं आहे.
ही बातमी वाचा: