Donald Trump Memes: डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतले, सोशल मीडीयावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी 'असे' केले स्वागत
Donald Trump Memes : ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बंदी हटवण्यासाठी मतदान केले होते, त्यानंतर त्यांचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात होते.
Donald Trump Memes : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ट्विटरवरील (Twitter) पुनरागमनानंतर सोशल मीडीयावर (Social Media) युजर्सच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. यूजर्स मजेदार कमेंट्ससह मीम्स आणि व्हिडिओ देखील शेअर करत आहेत. अनेक दिवसांनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट निळ्या रंगाची टिक लावून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी, ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बंदी हटवण्यासाठी मतदान केले होते, त्यानंतर त्यांचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात होते. ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाबद्दल युजर्सच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊया.
The people have spoken.
— Elon Musk (@elonmusk) November 20, 2022
Trump will be reinstated.
Vox Populi, Vox Dei. https://t.co/jmkhFuyfkv
ट्रम्प ट्विटरवर परत येताना, एलॉन मस्क यांनी ट्विट केले, जनता बोलली आहे. ट्रम्प यांना पुन्हा ट्विटरवर आणा. यावर एका यूजर लिहिले, त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सर्व फॉलोअर्ससोबत रिस्टोअर केले जावे. तुमच्याकडे सध्याच्या डेटाबेसमध्ये डेटा नसल्यास, त्यांचे अकाऊंट लाइव्ह झाल्यावर त्याचा बॅकअप घ्या.
— Joe Bidens Alphabet Agent (@patriot202121) November 20, 2022
Any advertiser still funding Twitter should immediately pause all advertising now.
— Derrick Johnson (@DerrickNAACP) November 20, 2022
एका जॉन्सन नावाच्या यूजरने लिहिले - कोणताही जाहिरातदार अद्याप ट्विटरला निधी देत असल्यास त्याने सर्व जाहिराती त्वरित थांबवाव्यात. एका युजरने मीम्सही शेअर केले आहेत.
Mood. pic.twitter.com/R8g6Bs07q4
— Benny Johnson (@bennyjohnson) November 20, 2022
Twitter servers right now pic.twitter.com/f65xDOb981
— Trung Phan (@TrungTPhan) November 20, 2022
#DonaldTrump entry on twitter be like pic.twitter.com/lgh54jFMDw
— VAZY🇮🇳(@vazy_7011) November 20, 2022
काही मिनिटांत 1 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स
मस्कच्या या पोलवर सुमारे 15,085,458 लोकांनी मतदान केले होते, त्यापैकी 51.8 टक्के मते ट्रम्पच्या पुनरागमनाच्या बाजूने होती आणि 48.2 टक्के लोकांना ट्रम्प ट्विटरवर परत येऊ इच्छित नव्हते. मस्कच्या ट्रम्प यांच्या रिटर्न पोलवरही अनेकांना राग आला होता. यूएसमध्ये हिंसाचारानंतर 8 जानेवारी 2021 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरने बंदी घातली होती. त्याचवेळी ट्विटरवर परतल्यानंतर ट्रम्प यांचे फॉलोअर्सही झपाट्याने वाढत आहेत. जेव्हा ट्रम्प यांचे खाते बंद झाले तेव्हा त्यांचे 2.3 लाख फॉलोअर्स होते, तर खाते सक्रिय झाल्यानंतर काही मिनिटांत 1 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स होते.
Trump is back on twitter
— Vedant Purohit (@iVedantPurohit) November 20, 2022
Meanwhile Biden :- #trumpisback #DonaldTrump pic.twitter.com/hjqOPCesdL
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: